Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, सोमवारी अवकाळी संकट, कुठं कोसळणार पाऊस?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. जानेवारीच्या मध्यावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे.
advertisement
कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान मुख्यतः ढगाळ ते अंशतः स्वच्छ राहील. सकाळी हलके धुके आणि थंड वारे जाणवतील. मुंबईत किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस आणि कमाल 30-32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून, किनारपट्टीवर उबदार वातावरण अनुभवास येईल. रात्री आणि सकाळी थंडी जाणवेल, पण ती तीव्र नसेल.
advertisement
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात सकाळी दाट धुके आणि गारठा अनुभवास येईल. पुण्यात किमान तापमान 10-12 अंश आणि कमाल 28-30 अंश राहील. हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, दुपारी उबदार सूर्यप्रकाश जाणवेल. काही ठिकाणी हलक्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील. तर सातारा, सांगली आणि सोलापूर मध्ये हलका पाऊस होईल.
advertisement
advertisement
advertisement
नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात राज्यातील सर्वाधिक थंडी राहील. किमान तापमान 8-12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी 6-7 अंशांपर्यंत घसरण शक्य आहे. सकाळी धुके आणि दुपारी स्वच्छ हवामान राहील. थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहून, लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement










