गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, तुरुंगात असेल: देवेंद्र फडणवीस
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नामचिन गुन्हेगारी टोळी असलेल्या आंदेकरांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी दिली आहे.
पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबात तिकिटे दिल्याने विरोधी पक्षाने त्यांना जोरदार लक्ष्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुन्हेगारांच्या राजकीय एन्ट्रीवर हल्लाबोल केला. गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल जेल असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नामचिन गुन्हेगारी टोळी असलेल्या आंदेकरांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. पुण्याच्या प्रचारात यावरून विरोधक सरकारला सुनावत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अजित पवार यांना कडक शब्दात सुनावले. अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले हिने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.
गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल जेल असेल
advertisement
६० लाख पुणेकर असताना गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची गरज काय? असे प्रश्न विचारीत कोयता गँग संपवा, पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करतील, असे बोलणाऱ्या लोकांनीच गुन्हेगारांना तिकीट दिली, आणि त्याच गुन्हेगारांच्या घरात तिकीट दिली. पण मी स्पष्टपणे सांगतो गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल जेल असेल, असे फडणवीस म्हणाले.
राजकीय पक्ष गुन्हेगारांना आश्रय देणार असेल तर...
advertisement
जर राजकीय पक्षच गुंडांच्या घरात तिकीटे देणार असेल, त्यांना आश्रय देणार असेल तर पोलिसांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. मनोधैर्य खचते, असे सांगत अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, तुरुंगात असेल: देवेंद्र फडणवीस











