Pandharpur Accident : दिवसभर ऊसतोडी करून घराकडे निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं, ट्रॅक्टर कंटेनरच्या अपघातात तिघांचा मृत्यू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पंढरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत ऊसतोडीची टोळी घराच्या दिशेने निघाली होती. पण वाटेतच ट्रॅक्टर कंटेनर पुलावरून कोसळला होता.त्यामुळे दोन्ही वाहने पुलावरून कोसळल्याने 3 नागरीकांचा जागीच मृत्यू झाला आहे,
Pandharpur Accident News : विरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर : पंढरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत ऊसतोडीची टोळी ट्रॅक्टरने घराच्या दिशेने निघाली होती. पण वाटेतच ट्रॅक्टर कंटेनर पुलावरून कोसळला होता.त्यामुळे दोन्ही वाहने पुलावरून कोसळल्याने 3 नागरीकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींची सध्या शोधाशोध सूरू आहे. तसेच घटनास्थळी क्रेनला पाचारण करण्यात आले असून युद्धपातळीवर बचाव कार्य सूरू आहे. या घटनेने पंढरपूर हादरलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधून ऊसतोडी करणारी एक टोळी दिवसभर ऊसतोडी करून थकून भागून ट्रॅक्टरने घराच्या दिशेने निघाली होती. यावेळी वाटेत लागलेल्या एका पुलावरून जात असताना ट्रॅक्टर कंटेनर पुलावरून कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत 3 नागरीकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तर 6 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.
advertisement
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ही ऊसतोडींची टोळी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या अपघातानंतर कंटेनर आणि ट्रॅक्टरच्या खालील नागरिकांचे अद्याप शोध कार्य सुरू आहे. क्रेनला देखील पाचारण करण्यात आले आहे आणि युद्धपातळीवर बचावकार्य सूरू आहे. दरम्यान या घटनेतील मृतांची नावे अद्याप समोर आली नाही आहेत. पण या घटनेने पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur Accident : दिवसभर ऊसतोडी करून घराकडे निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं, ट्रॅक्टर कंटेनरच्या अपघातात तिघांचा मृत्यू











