'गोकुळ'चं दूध 1 रुपयाने महागलं! दूध उत्पादकांना मिळणार 'इतके' कोटी; कधीपासून लागू होणार नवा दर?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीम यांनी सांगितले की, "दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलीटर 1 रुपयांची..."
Kolhapur News : येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात (Gokul milk price hike) प्रतिलीटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'कडून घेण्यात आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना महिन्याकाठी साडेचार ते पाच कोटींचा ज्यादाचा दर मिळणार आहे. पण सद्यस्थितीत विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
अशाप्रकारे गाय आणि म्हैस दूध दरात झालीय वाढ
गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीम यांनी सांगितले की, "दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलीटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील म्हैस दूधाच्या खरेदी दरात 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफसाठी प्रतिलीटर 50.50 वरून 51.50 रुपये करण्यात आला आहे.
advertisement
इतरही महत्त्वाचे निर्णय
"त्याचबरोबर 6.5 फॅट आणि 9.0 एसएनएफसाठी प्रतिलीटर 54.80 वरून 55.80 रुपयापर्यंत करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी प्रतिलीटर दूध खरेदी दरात 32 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आला आहे. संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा या विषयांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत", अशी माहिती नविद मुश्रीफ यांनी दिली.
advertisement
हे ही वाचा : Weather Alert: ऑगस्टअखेर पावसाचा जोर, मुंबईत वारं फिरलं, कोकणात यलो अलर्ट, आजचा हवामान अंदाज
हे ही वाचा : "तुमचा अतिरेक्यांशी संबंध आहे", डाॅक्टर पिता-पूत्रास घातली भीती; लुटले तब्बल 43 लाख, कोल्हापूरात खळबळ!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'गोकुळ'चं दूध 1 रुपयाने महागलं! दूध उत्पादकांना मिळणार 'इतके' कोटी; कधीपासून लागू होणार नवा दर?


