शेअर बाजारात उद्या ‘ॲक्शन डे’, ‘हाय व्होल्टेज’ ट्रेडिंग होणार; गुंतवणूकदारांनी रात्रीच सुरू केली पैशाची जमवाजमव

Last Updated:
Share Market Prediction: मंगळवारी बाजारात घसरण दिसली असली तरी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. ICICI Lombard, Tata Elxsi, Thomas Cook, Indian Overseas Bank यांसारख्या शेअर्समध्ये बुधवारी हालचाल पाहायला मिळू शकते.
1/11
शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली असली, तरी सत्राच्या शेवटी नीचांकी पातळीवरून बाजाराने काहीशी सावरलेली हालचाल दाखवली. मात्र बुधवारी केवळ निर्देशांकच नव्हे, तर काही निवडक शेअर्सवरही गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. कारण या कंपन्यांशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर समोर आल्या आहेत. ICICI Lombard, Tata Elxsi, Thomas Cook, Indian Overseas Bank, 5paisa Capital यांसह काही अन्य शेअर्समध्ये बुधवारी हालचाल दिसू शकते.
शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली असली, तरी सत्राच्या शेवटी नीचांकी पातळीवरून बाजाराने काहीशी सावरलेली हालचाल दाखवली. मात्र बुधवारी केवळ निर्देशांकच नव्हे, तर काही निवडक शेअर्सवरही गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. कारण या कंपन्यांशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर समोर आल्या आहेत. ICICI Lombard, Tata Elxsi, Thomas Cook, Indian Overseas Bank, 5paisa Capital यांसह काही अन्य शेअर्समध्ये बुधवारी हालचाल दिसू शकते.
advertisement
2/11
ICICI Lombard General InsuranceICICI Lombard चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी घटून 659 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 724 कोटी रुपये होता. मात्र नफ्यात घट झाली असली तरी कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न 12.4 टक्क्यांनी वाढून 6,610 कोटी रुपये झाले असून, मागील वर्षी ते 5,882 कोटी रुपये होते.
ICICI Lombard General Insurance ICICI Lombard चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी घटून 659 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 724 कोटी रुपये होता. मात्र नफ्यात घट झाली असली तरी कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न 12.4 टक्क्यांनी वाढून 6,610 कोटी रुपये झाले असून, मागील वर्षी ते 5,882 कोटी रुपये होते.
advertisement
3/11
Tata ElxsiTata Elxsi चा निव्वळ नफा तिमाही आधारावर मोठ्या प्रमाणात घटला आहे. कंपनीचा नफा 29.6 टक्क्यांनी घसरून 109 कोटी रुपयांवर आला आहे, तर मागील तिमाहीत तो 154.8 कोटी रुपये होता. मात्र उत्पन्नाच्या बाबतीत कंपनीने वाढ नोंदवली आहे. Tata Elxsi चे उत्पन्न 3.8 टक्क्यांनी वाढून 953.5 कोटी रुपये झाले आहे, जे आधी 918.1 कोटी रुपये होते. EBIT मध्ये 17.7 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीचा मार्जिन 18.5 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.
Tata Elxsi Tata Elxsi चा निव्वळ नफा तिमाही आधारावर मोठ्या प्रमाणात घटला आहे. कंपनीचा नफा 29.6 टक्क्यांनी घसरून 109 कोटी रुपयांवर आला आहे, तर मागील तिमाहीत तो 154.8 कोटी रुपये होता. मात्र उत्पन्नाच्या बाबतीत कंपनीने वाढ नोंदवली आहे. Tata Elxsi चे उत्पन्न 3.8 टक्क्यांनी वाढून 953.5 कोटी रुपये झाले आहे, जे आधी 918.1 कोटी रुपये होते. EBIT मध्ये 17.7 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीचा मार्जिन 18.5 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.
advertisement
4/11
5paisa Capital5paisa Capital च्या आर्थिक निकालातही कमजोरी दिसून आली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 24 टक्क्यांनी घटून 12.3 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा 16.2 कोटी रुपये होता. कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली असून, 7 टक्क्यांच्या घसरणीसह उत्पन्न 79.3 कोटी रुपयांवर आले आहे. एक वर्षापूर्वी ते 85.3 कोटी रुपये होते.
5paisa Capital 5paisa Capital च्या आर्थिक निकालातही कमजोरी दिसून आली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 24 टक्क्यांनी घटून 12.3 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा 16.2 कोटी रुपये होता. कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली असून, 7 टक्क्यांच्या घसरणीसह उत्पन्न 79.3 कोटी रुपयांवर आले आहे. एक वर्षापूर्वी ते 85.3 कोटी रुपये होते.
advertisement
5/11
Thomas Cookपर्यटन क्षेत्रातील दिग्गज Thomas Cook ने गुजरात सरकारसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. गुजरातमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे Thomas Cook च्या पर्यटन व्यवसायाला भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे.
Thomas Cook पर्यटन क्षेत्रातील दिग्गज Thomas Cook ने गुजरात सरकारसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. गुजरातमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे Thomas Cook च्या पर्यटन व्यवसायाला भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/11
Interarch BuildingInterarch Building Systems कंपनीला प्री-इंजिनिअर्ड स्टील बिल्डिंग सिस्टीमच्या उत्पादनासाठी 130 कोटी रुपयांचा मोठा ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर कंपनीच्या ऑर्डर बुकसाठी सकारात्मक मानला जात आहे.
Interarch Building Interarch Building Systems कंपनीला प्री-इंजिनिअर्ड स्टील बिल्डिंग सिस्टीमच्या उत्पादनासाठी 130 कोटी रुपयांचा मोठा ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर कंपनीच्या ऑर्डर बुकसाठी सकारात्मक मानला जात आहे.
advertisement
7/11
Just DialJust Dial चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 10.2 टक्क्यांनी घटून 117.9 कोटी रुपयांवर आला आहे. मात्र कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. Just Dial चे उत्पन्न 6.4 टक्क्यांनी वाढून 305.6 कोटी रुपये झाले आहे. EBITDA मध्ये 9.6 टक्क्यांची वाढ झाली असून, EBITDA मार्जिन 30.2 टक्क्यांवरून 31.1 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.
Just Dial Just Dial चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 10.2 टक्क्यांनी घटून 117.9 कोटी रुपयांवर आला आहे. मात्र कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. Just Dial चे उत्पन्न 6.4 टक्क्यांनी वाढून 305.6 कोटी रुपये झाले आहे. EBITDA मध्ये 9.6 टक्क्यांची वाढ झाली असून, EBITDA मार्जिन 30.2 टक्क्यांवरून 31.1 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.
advertisement
8/11
Indian Overseas BankIndian Overseas Bank ने आपल्या एक वर्षाच्या MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये कोणताही बदल न करता तो 8.80 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र ओव्हरनाइट MCLR मध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचा बँकेच्या कर्जदरांवर परिणाम होऊ शकतो.
Indian Overseas Bank Indian Overseas Bank ने आपल्या एक वर्षाच्या MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) मध्ये कोणताही बदल न करता तो 8.80 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र ओव्हरनाइट MCLR मध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचा बँकेच्या कर्जदरांवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
9/11
Karnataka BankKarnataka Bank ने ‘Khajane-2’ हे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरक्षित, रिअल-टाइम आणि पूर्णपणे पेपरलेस रिसीट सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे सरकारी व्यवहार अधिक सुलभ होतील.
Karnataka Bank Karnataka Bank ने ‘Khajane-2’ हे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरक्षित, रिअल-टाइम आणि पूर्णपणे पेपरलेस रिसीट सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे सरकारी व्यवहार अधिक सुलभ होतील.
advertisement
10/11
NLC IndiaNLC India ने गुजरात सरकारसोबत मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) प्रकल्पांच्या विकासासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे कंपनीसाठी दीर्घकालीन संधी निर्माण होऊ शकतात.
NLC India NLC India ने गुजरात सरकारसोबत मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) प्रकल्पांच्या विकासासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे कंपनीसाठी दीर्घकालीन संधी निर्माण होऊ शकतात.
advertisement
11/11
Responsive IndustriesResponsive Industries कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीचे CFO भवनीत सिंह चड्ढा यांनी 12 जानेवारी 2026 पासून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीचा कंपनीच्या शेअरवर अल्पकालीन परिणाम होऊ शकतो. Disclaimer: वरील माहिती ही केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Responsive Industries Responsive Industries कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीचे CFO भवनीत सिंह चड्ढा यांनी 12 जानेवारी 2026 पासून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीचा कंपनीच्या शेअरवर अल्पकालीन परिणाम होऊ शकतो. Disclaimer: वरील माहिती ही केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement