'मोठा मित्र येणार' रवींद्र चव्हाणांच्या सूचक वक्तव्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील चर्चेत, अखेर स्पष्टच बोलले

Last Updated:

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 'सर्व मित्र येत आहेत. लवकरच मोठा मित्र पण येईल' असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांचा इशारा कुणाकडे आहे

News18
News18
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक यंदा बिनविरोध नगरसेवकांच्या विजयामुळे चांगलीच गाजली. त्यानंतर आता नाराज मनसे नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ऐन निवडणुकीत खळबळ उडाली. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आणखी मोठा मित्र येणार, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी "त्याचा संदर्भ माझ्याशी जोडत असाल तर तर मी एकच सांगेन, जेव्हा ते माझे नाव घेऊन बोलतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईल' अशी प्रतिक्रिया दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले.  दोन दिवसांपूर्वी मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.  या प्रवेश कार्यक्रमादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 'सर्व मित्र येत आहेत. लवकरच मोठा मित्र पण येईल' असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांचा इशारा कुणाकडे आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं. यावर राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
advertisement
"भाजपची ही पद्धत आहे. लोकांना कन्फुज करायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. माझी 1995 पासून रवींद्र चव्हाण हे माझे मित्र आहे.  त्यांचे अनेक मित्र मोठे झाले, काहींचा एन्काऊंटर देखील झाला. ते नक्की कोणत्या मित्रांबद्दल बोलले हे मला माहित नाही. त्याचा संदर्भ माझ्याशी जोडत असाल तर तर मी एकच सांगेन. माझी पक्षनिष्ठा ही कुठली मैत्री, पैसा आणि दमबाजी कुणी विकत घेऊ शकत नाही. हे रवींद्र चव्हाण यांना चांगलं माहित आहे.  जेव्हा ते माझे नाव घेऊन बोलतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईल, असं म्हणत राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
advertisement
'डोंबिवलीत पैसे वाटप करताना लोकांनी पकडलं.  लोक सर्रासपणे पैसे वाटत होते.  त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.  रात्रीच्या वेळेस काही लोक संशयास्पदरित्या फिरत असलेले वाद झाला आणि मारामारी झाली. डोंबिवलीची ही संस्कृती आहे का? रस्त्यावर उतरून लोकांनी जबाब दिला पाहिजे, असंही राजू पाटील म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'मोठा मित्र येणार' रवींद्र चव्हाणांच्या सूचक वक्तव्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील चर्चेत, अखेर स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement