IPL मधून एक कॉल अन् PSL चाच गेम केला... पाकिस्तानची ऑफर धुडकावून वेस्ट इंडिजचा स्टार निघाला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीनंतर आणखी एका खेळाडूने पाकिस्तान सुपर लीगला धक्का दिला आहे. मुझरबानी प्रमाणेच हा खेळाडूही पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येणार आहे.
मुंबई : झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीनंतर आणखी एका खेळाडूने पाकिस्तान सुपर लीगला धक्का दिला आहे. मुझरबानी प्रमाणेच हा खेळाडूही पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येणार आहे. आयपीएल ही जगातली सगळ्यात महागडी लीग आहे. परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यात जास्त रस असतो, पण आयपीएलमध्ये संधी मिळत नाही तेव्हा हे खेळाडू पीएसएलमध्ये जाऊन खेळतात, पण आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत असेल तर हे खेळाडू पीएसएल सोबत केलेला करार मोडून आयपीएल खेळण्यासाठी येतात. वेस्ट इंडिजचा स्टार स्पिनर गुडाकेश मोतीदेखील याचंच अनुकरण करत आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गुडाकेश मोती टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतातून वेस्ट इंडिजमध्ये परतला, यानंतर त्याने पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. गुडाकेश मोतीला लाहोर कलंदर्सने करारबद्ध केलं होतं.
PSL IPL switch again
Gudakesh Motie pulls out of PSL (Lahore Qalandars) to join Lucknow Super Giants as Hasaranga’s replacement.
From ₹32 lakh deal to the IPL spotlight — priorities loud and clear. pic.twitter.com/Cvb5SWiHRY
— Tapish (@crictapish) March 16, 2026
advertisement
गुडाकेश मोतीने पीएसएलमधून माघार घेतल्यानंतर तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजाएंट्सकडून खेळेल, असं बोललं जात आहे. श्रीलंकेचा स्पिनर वानिंदू हसरंगाची जागा गुडाकेश मोती घेऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हसरंगाला दुखापत झाली होती. 2026 च्या आयपीएलमध्ये लखनऊने हसरंगाला 2 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. हसरंगाची जागा मोती घेणार का नाही? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
advertisement
मोतीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
गुडाकेश मोती हा वेस्ट इंडिजकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. मोतीने आतापर्यंत 11 टेस्ट, 34 वनडे आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये मोतीच्या नावावर 35 विकेट आहेत, याशिवाय त्याने 265 रन केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 42 विकेट घेऊन 357 रन आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 7.91 च्या इकोनॉमी रेटने 49 विकेट घेतल्या आणि 205 रन केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 11:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL मधून एक कॉल अन् PSL चाच गेम केला... पाकिस्तानची ऑफर धुडकावून वेस्ट इंडिजचा स्टार निघाला!








