advertisement

ग्रामपंचायत कार्यालयच बनला कुस्तीचा आखाडा, सफाई कर्मचाऱ्याला बेदम चोपल,पाहा VIDEO

Last Updated:

दोन महिला सदस्यांनी उठून त्या सफाई कर्मचाऱ्याला चोप दिला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

palghar manor
palghar manor
Palghar News : राहुल पाटील,प्रतिनिधी, पालघर : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ग्रामपंचायत कार्यालयच कुस्ती सूरू असल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सगळे सदस्य जमले होते.या दरम्यान सफाई कर्मचारी आपली काहीतरी मागणी ठेवत होता. यावेळी दोन महिला सदस्यांनी उठून त्या सफाई कर्मचाऱ्याला चोप दिला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
पालघरच्या मनोर ग्रामपंचायतीत ही घटना घडली आहे.या घटनेत ग्रामपंचायतीतील महिला सदस्यांनी दादागिरी करून या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
[video width="480" height="544" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-16-at-10.07.05-PM-2026-03-c3e7544754ace8e076a0e4d3bbd03d13.mp4"][/video]
त्याच झालं असं महिला सदस्यांचा भाऊ शौचालयात गेला होता.यावेळी शोचालयात असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने त्याच्याकडून पैसे मागितले होते. या घटनेचा राग मनात धरून ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.
advertisement
व्हिडिओत तुम्ही ग्रामपंचायती समोर हा तरुण उभा आहे. यावेळी हा सफाई कर्मचारी घटलेली संपूर्ण घटना ग्रामपंचायतीला सांगत आहे. या दरम्यान अचानक ग्रामपंचायतीची एक महिला खूर्चीवरून उठते आणि सफाई कर्मचाऱ्याला मारायला सूरूवात करते. या महिलेच्या पाठोपाठ आणखी एक महिला उठते आणि सफाई कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवायला सूरूवात करते. सफाई कर्मचारी मात्र या महिलांवर कोणताही हल्ला करत नाही,यानंतर ग्रामपंचायतीतला आणखी एक सदस्य मध्यस्थी करत हा वाद मिटवतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ग्रामपंचायत कार्यालयच बनला कुस्तीचा आखाडा, सफाई कर्मचाऱ्याला बेदम चोपल,पाहा VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement