Winter Care : हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपणं ही चांगली सवय आहे की नाही? डॉक्टरांनी सांगितलं कोणी करु नये असा प्रकार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
शरीराला ऊब देणारी ही सवय खरोखरच आरोग्यदायी आहे का? की यामुळे काही छुपे धोके निर्माण होऊ शकतात? स्लीप एक्सपर्ट्स आणि डॉक्टरांच्या मते, या साध्या वाटणाऱ्या सवयीचा थेट संबंध तुमच्या झोपण्याच्या पद्धतीशी आणि आरोग्याशी आहे.
मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की, रात्री अंथरुणात शिरल्यावरही बराच वेळ थंडी वाजत राहते. कितीही पांघरूण घेतलं तरी पाय बर्फासारखे गार लागतात आणि त्यामुळे तासनतास डोळा लागत नाही. अशात अनेकजण खास करुन वृद्ध लोक थंडीपासून वाचण्यासाठी 'पायात मोजे घालून झोपतात. पण ही पद्धत खरोखर चांगली आहे का?
शरीराला ऊब देणारी ही सवय खरोखरच आरोग्यदायी आहे का? की यामुळे काही छुपे धोके निर्माण होऊ शकतात? स्लीप एक्सपर्ट्स आणि डॉक्टरांच्या मते, या साध्या वाटणाऱ्या सवयीचा थेट संबंध तुमच्या झोपण्याच्या पद्धतीशी आणि आरोग्याशी आहे.
मोजे घालून झोपल्याने लवकर झोप का लागते?
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, पाय गरम झाले की शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्याला 'वेसोडिलेशन' (Vasodilation) म्हणतात. जेव्हा पाय उबदार असतात, तेव्हा मेंदूला संदेश जातो की आता शरीर पूर्णपणे रिलॅक्स मोडमध्ये असून झोपण्याची वेळ झाली आहे. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, जे लोक मोजे घालून झोपतात त्यांना इतरांच्या तुलनेत 10 ते 15 मिनिटे लवकर झोप लागते.
advertisement
फक्त ऊबच नाही, 'या' समस्यांवरही होतो फायदा
रात्री मोजे घालून झोपण्याचे काही रंजक फायदे तज्ज्ञांनी सांगितले आहेत.
-रजोनिवृत्ती (Menopause) जवळ आलेल्या महिलांना रात्री अचानक घाम येतो किंवा उष्णता वाटते. मोजे घातल्याने शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित राहते आणि हा त्रास कमी होतो.
-फाटलेल्या टाचा (Cracked Heels): जर तुम्ही पायाला नारळाचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावून सुती मोजे घालून झोपलात, तर पाय मऊ पडतात आणि टाचांना पडलेल्या भेगा लवकर भरून येतात.
advertisement
-ज्यांना थंडीमुळे हात-पायांची बोटे निळी पडण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ही सवय वरदान ठरते.
पण 'या' लोकांनी मोजे घालून झोपू नये
जरी मोजे घालणे फायदेशीर असले, तरी प्रत्येकासाठी हे योग्य नाही. खालील व्यक्तींनी काळजी घ्यावी:
१. मधुमेही रुग्ण: ज्यांना डायबेटिस आहे किंवा पायात रक्तभिसरण कमी होते, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मोजे घालू नयेत.
advertisement
२. ब्लड सर्कुलेशनच्या समस्या: खूप घट्ट (Tight) मोजे घातल्याने पायातील रक्ताभिसरण रोखले जाऊ शकते, ज्यामुळे सूज किंवा मुंग्या येण्याचा त्रास होतो.
३. त्वचेचे संसर्ग: जर तुम्हाला आधीच पायाला फंगल इन्फेक्शन असेल, तर मोजे घातल्याने घाम साचून इन्फेक्शन वाढू शकते.
मोजे घालताना कोणती काळजी घ्याल?
जर तुम्हाला मोजे घालून झोपण्याची सवय असेल, तर नायलॉन किंवा सिंथेटिक मोजे पूर्णपणे टाळा. त्याऐवजी स्वच्छ, सैल आणि सुती (Cotton) मोजे निवडा. घट्ट मोज्यांमुळे पायांच्या नसांवर ताण येऊ शकतो, त्यामुळे मोजे नेहमी ढिले असावेत.
advertisement
मोजे आवडत नसतील तर 'हे' पर्याय वापरा
तुम्हाला मोजे घालून झोपायला आवडत नसेल, तर पाय गरम ठेवण्याचे इतरही मार्ग आहेत:
झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा.
पायांच्या तळव्यांना हलक्या हाताने मालिश करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल.
जाड ब्लँकेटमध्ये पाय पूर्णपणे झाकून घ्या.
हिवाळ्यात थंड पायांमुळे (Cold Feet) झोप मोड होत असेल, तर मोजे घालणे हा एक उत्तम उपाय आहे. मात्र, मोजे स्वच्छ आणि सैल असावेत याची काळजी घेतल्यास तुमची झोप नक्कीच सुखद होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 10:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपणं ही चांगली सवय आहे की नाही? डॉक्टरांनी सांगितलं कोणी करु नये असा प्रकार








