पहिल्या दिवशी 'तुफान' अन् आता नॉमिनेशनच्या पतंगाची टांगती तलवार! BBM6 च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मोठा राडा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
पहिल्या दिवसाचा धक्का पचवण्याआधीच आता दुसऱ्या दिवशी मोठा धमाका होणार आहे. समोर आलेल्या इनसाइड फोटोंनुसार, घरात पहिले नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.
advertisement
advertisement
८०० खिडक्या आणि ९०० दारांच्या या चकचकीत घरामध्ये शिरल्यावर सदस्यांना वाटलं होतं की, किमान एखादा दिवस तरी लाड होतील. पण बिग बॉसने त्यांचा हा गैरसमज पहिल्याच तासांत मोडीत काढला. बिग बॉसने जाहीर केलं की, या घरात काहीही मोफत मिळणार नाही. तुम्हाला हवं असलेलं रेशन आणि सुखसुविधा 'गोल्डन, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ' कार्डच्या आधारावरच मिळतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घराच्या गार्डन एरियामध्ये प्रत्येक स्पर्धकाचा फोटो असलेला पतंग लावण्यात आला आहे. आता हे नॉमिनेशन कसं होणार? कोणाचा पतंग कापला जाणार आणि कोणाची मांजावर पकड घट्ट राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनच्या कचाट्यात कोण सापडणार, यावरून स्पर्धकांमध्ये आतापासूनच गुप्त खलबतं सुरू झाली आहेत.
advertisement
सुखसुविधा तर गेल्याच, पण आता साखरेचा एक दाणा आणि चहाच्या कपासाठीही घरात संघर्ष पाहायला मिळतोय. रेशनच्या विभाजनावरून सदस्यांमध्ये ठिणगी पडली असून, चहा-नाश्त्याच्या मुद्द्यावरून गटबाजीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला भूक आणि दुसऱ्या बाजूला नॉमिनेशनची टांगती तलवार, अशा कात्रीत यंदाचे स्पर्धक अडकले आहेत.<span style="font-size: 20px;"> </span>








