Makar Sankranti 2026 Donation: मकर संक्रांतीला दान करण्याचं पुण्य मोठं; या वस्तू दिल्यानं वाईट काळ संपतो
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti Daan 2026: मकर संक्रातीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये मकर संक्रातीच्या वस्तूंची मोठी खरेदी होत आहे. यावर्षी मकर संक्रांत 14 आणि 15 जानेवारी अशा दोन दिवशी आहे, पण 15 जानेवारीला संक्रांत साजरी करणं जास्त चांगलं मानलं जातंय. कारण त्या दिवशी सूर्योदयापासून पुण्यकाळ असणार आहे.
14 किंवा 15 जानेवारी कोणत्याही दिवशी संक्रांत साजरी केली तरी स्नान आणि पूजेनंतर काही खास वस्तूंचं दान नक्की करा. असं म्हणतात की, संक्रांतीला केलेल्या दानामुळे नशीब उजळू शकतं आणि करिअरमध्ये प्रगती होते. याविषयी प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित राकेश पाण्डेय यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या वस्तूंचं दान करणं शुभ ठरेल ते पाहूया.
advertisement
मकर संक्रांतीला काय दान करावं?ज्योतिषाचार्यांच्या मते, जे लोक संक्रांतीच्या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे दान करतात, त्यांना पुढच्या जन्मी त्या वस्तूच्या 100 पट जास्त फळ मिळतं. या दिवशी तुम्ही स्वतःसाठी आणि पित्रांच्या शांतीसाठीही दान करू शकता. पित्रांच्या नावाने केलेल्या दानामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. संक्रांतीला खालील वस्तूंचं दान करणे शुभ ठरेल.
advertisement
काळे तीळ किंवा तिळाचे लाडू - स्नानानंतर काळे तीळ किंवा तिळाच्या लाडूंचं दान करणं खूप महत्त्वाचं आहे. तिळामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनीचीही कृपादृष्टी राहते. ज्यांच्या कुंडलीत शनीचे दोष आहेत, त्यांना यामुळे आराम मिळतो. तीळ हे पापांचा नाश करणारे मानले जातात. तसेच गुळाचा संबंध सूर्याशी असतो. त्यामुळे तीळ आणि गुळाचे लाडू दान केल्याने सूर्य आणि शनी दोन्ही ग्रहांची साथ मिळते आणि आयुष्यात चांगले दिवस येतात.
advertisement
मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे. यात तांदूळ, डाळ, हळद आणि मीठ या मुख्य गोष्टी असतात. दान करताना खिचडी शिजवून देण्यापेक्षा ती बनवण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य (तांदूळ, डाळ इ.) दान करणं जास्त चांगलं मानलं जातं. अनेक ठिकाणी मंदिरातही तांदूळ, डाळ आणि तीळ खिचडीच्या स्वरूपात देवाला अर्पण केले जातात.
advertisement
advertisement
पित्रांसाठी दान - मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून अन्न आणि कपड्यांचं दान करावं. यामुळे पितृ लोकात त्यांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










