सस्पेन्स वाढला! क्राईम ब्रांचच्या एन्ट्रीवर नरेश अरोरा आणि अजित पवारांचं नो कमेंट्स
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचे देखील म्हटले आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी धडक दिली. या कार्यालयात पुणे गुन्हे शाखेने चौकशी केल्याची माहिती नरेश अरोरा यांनी दिलीय. गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयात आले होते. कार्यालयात नेमकं काय कामकाज चालते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते काम येथे सुरू आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तसेच काही कागदपत्रांची माहितीही मागितली, असे अरोरा यांनी सांगितलं. नरेश अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडे काही तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीतील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित व्यक्ती सध्या फोन उचलत नाही. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम करत आहे. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने धडक दिली त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अजित पवारांनी या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचे देखील म्हटले आहे.
advertisement
नरेश अरोरा काय म्हणाले?
नरेश अरोरा म्हणाले, चौकशीसाठी आलेले अधिकारी पुणे गुन्हे शाखेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी कार्यालयातून कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती मिळाल्यानंतर ते समाधानाने निघून गेले. आमच्याकडे पैसे वाटप होत असते, असे आरोप असते तर इथे काहीतरी सापडले असते. मात्र, येथे काहीही आढळून आले नाही. चौकशीदरम्यान कोणती कागदपत्रे मागितली गेली, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
advertisement
कागदपत्रांची माहिती देण्यास नरेश अरोरांचा नकार
हा प्रकार राजकीय कामाशी संबंधित असल्याने अशा चौकशा होत राहतात, असे मत व्यक्त करताना नरेश अरोरा म्हणाले क, मी राजकीय व्यक्ती नाही. गेल्या दहा वर्षांपासून काम करत असून कधीही चुकीचे काम केलेले नाही. मी नेहमी सकारात्मक काम करतो. आपल्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेले नसल्याचे तसेच पोलीस आयुक्तांशी कोणतेही संभाषण झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या यापुढे राजकीय विषयावर बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे.
advertisement
या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सस्पेन्स वाढला! क्राईम ब्रांचच्या एन्ट्रीवर नरेश अरोरा आणि अजित पवारांचं नो कमेंट्स









