प्रसिद्ध सिंगरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? ऑस्ट्रेलिअन GF चे गंभीर आरोप, पत्नीची 'ती' पोस्ट चर्चेत!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversy: घराघरांत लोकप्रिय झालेल्या या गायकावर एकामागून एक दोन विदेशी तरुणींनी फसवणुकीचे आणि प्रेमात धोका दिल्याचा आरोप केला आहे.
advertisement
advertisement
सर्वात आधी कॅनडातील 'Ms Gori' नावाच्या एका महिला आर्टिस्टने करण औजलावर गंभीर आरोप केले. तिचं म्हणणं आहे की, करणने आपलं लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जवळीक साधली आणि तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा तिला त्याच्या लग्नाबद्दल समजलं, तेव्हा तिला धमक्या देण्यात आल्या आणि तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा तिने केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, या फोटोच्या बॅकग्राउंडला तिने करणचंच 'विनिंग स्पीच' हे गाणं लावलं आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, पलकने शब्दांशिवाय या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. "काहीही झालं तरी मी माझ्या पतीसोबत आहे," असाच संदेश तिने या पोस्टमधून दिल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
करण औजला हा सध्याच्या घडीचा सर्वात यशस्वी पंजाबी रॅपर आणि गायक आहे. 'विनिंग स्पीच', 'तौबा तौबा' आणि 'सॉफ्टली' यांसारख्या गाण्यांमुळे त्याने जगभर नाव कमावलं आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच त्याच्यावर झालेल्या या कॅरेक्टरवरील आरोपांमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








