डाळिंबाचे भाव तेजीत, शेवगा आणि गुळाला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
गुळाची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2925 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली मार्केटमध्ये 1279 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 664 क्विंटल गुळास जास्तीत जास्त 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज 334 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 266 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 10000 ते 14000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 36 क्विंटल शेवग्यास 19500 रुपये सर्वात जास्त सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
डाळिंबाचे भाव तेजीत
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1068 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 833 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 12500 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
डाळिंबाचे भाव तेजीत, शेवगा आणि गुळाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement