तिळगुळ होणार नाहीत कडक, पाकात बनवा झटपट रेसिपी, संपूर्ण Video

Last Updated:

नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत म्हटले की सगळीकडे तिळगुळ बघायला मिळतात.

+
News18

News18

कल्याण : नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत म्हटले की सगळीकडे तिळगुळ बघायला मिळतात. परंतु तिळगुळ बनवताना हलगर्जीपणा केला तर तिळगुळ ठिसूळ न होता कडक होतात. त्यामुळे सहसा लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती तिळगुळ खाणे कंटाळा करतात. आज आपण तिळगुळ आणि चिक्की बनवण्यासाठी कोणत्या टिप्स आणि साहित्य किती प्रमाणात घ्यावे हे बघणार आहोत.
तिळगुळ साहित्य 
पांढरे तीळ: अर्धा किलो
चिक्कीचा गूळ (किसलेला): 1 किलो
तूप: 1 -2 चमचे (ऐच्छिक)
सुंठ पावडर: 1/4 चमचा (ऐच्छिक)
वेलची पूड/जायफळ - (ऐच्छिक)
शेंगदाणे - अर्धा किलो
सुके खोबऱ्याचा कीस (ऐच्छिक): 2-3 चमचे
advertisement
तिळगुळ कृती 
तीळ भाजणे: एका जाड बुडाच्या भांड्यात तीळ मंद आचेवर सुगंध लालसर येईपर्यंत हलके भाजून घ्या. जास्त भाजू नका.
गूळ वितळवणे: दुसऱ्या भांड्यात गूळ आणि तूप एकत्र करून मंद आचेवर वितळवून घ्या. गूळ पूर्ण वितळला की फेस येईल.
मिश्रण तयार करणे: वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ आणि इतर साहित्य (सुंठ, वेलची, खोबऱ्याचा कीस) टाकून चांगले मिसळा.
advertisement
लाडू/वडी वळणे: मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे लाडू किंवा वड्या वळा. करून काही वेळासाठी बाहेर ठेऊन देणे. 20 मिनिटांनंतर बंद डब्ब्यात ठेवून देणे.
टिप्स - 1. बंद डब्यात गरम लाडू ठेवल्यास 2 दिवसांतच लाडू खराब होऊन वास येऊ शकतो.
2. थंड लाडू पॅक डब्ब्यात ठेवल्यास 2 महिने आरामात टिकू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
तिळगुळ होणार नाहीत कडक, पाकात बनवा झटपट रेसिपी, संपूर्ण Video
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement