संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bhogi Bhaji: भोगीच्या दिवशी हंगामात उपलब्ध असलेल्या विविध भाज्यांचा वापर करून खास भाजी केली जाते. या भाजीला भोगीची भाजी असं म्हटलं जातं.
पुणे: मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी काही खास रुढी आणि परंपरा पाळल्या जातात. या सणांमागे धार्मिक महत्त्व आहे, तसेच त्याला वैज्ञानिक बाजूही जोडलेली आहे. भोगीच्या दिवशी हंगामात उपलब्ध असलेल्या विविध भाज्यांचा वापर करून खास भाजी केली जाते. या भाजीला भोगीची भाजी असं म्हटलं जातं. भोगी नेमकी का साजरी केली जाते? या भाजीमागची परंपरा काय आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात?
भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असा होतो. या काळात हंगामानुसार विविध भाज्या येतात आणि त्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या भाज्यांची एकत्रित भाजी तयार केली जाते, जी भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते आणि ती तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते.
advertisement
भोगी सण शेतात आलेल्या नव्या पिकांसाठी भगवान इंद्राचा आशीर्वाद मानून साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, इंद्रदेवाने धरतीवर पिके आणि धनधान्य भरभराट व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे वर्षभर पिकांची भरभराट व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. भोगीचा सण फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही; देशभरात वेगवेगळ्या नावांनी आणि स्थानिक परंपरांनुसार हा सण साजरा केला जातो.
advertisement
भोगीची भाजी खाण्याचे फायदे
view commentsभोगीच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी केवळ परंपरेसाठी नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हंगामी भाज्या आणि डाळी एकत्र करून बनवलेली ही भाजी शरीराला आवश्यक पोषण देते. हिवाळ्यात शरीरात निर्माण होणारा कफ कमी होतो, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे अनेक फायदे ही भाजी खाल्ल्यामुळे होतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी या हंगामी भाज्यांचे सेवन न करणारी व्यक्ती आरोग्यासाठी उपयुक्त गोष्टींपासून वंचित राहते, असे मानले जाते. ‘जो न खाई भोगी, तो सदा रोगी’ अशी म्हणही प्रचलित आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 10:09 AM IST








