अबु सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, 14 दिवस पॅरोल शक्यच नाही, राज्य सरकारने मांडली कोर्टात भूमिका

Last Updated:

1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोट मालिकेतील दोषी आणि गॅगस्टर अबु सालेमने 14 दिवसांचा पॅरोल देण्यास राज्य सरकारचा विरोध केला आहे. अबु सालेम एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्या इतक्या दिवस बाहेर सोडणे शक्य नसल्याने राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

Abu Salem
Abu Salem
Gangster Abu Salem : 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोट मालिकेतील दोषी आणि गॅगस्टर अबु सालेमने 14 दिवसांचा पॅरोल देण्यास राज्य सरकारचा विरोध केला आहे. अबु सालेम एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्या इतक्या दिवस बाहेर सोडणे शक्य नसल्याने राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.
advertisement
खरं तर गँगस्टर अबू सालेमने 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल देण्याची मागणी केली होती. मात्र अबू सालेमला 14 दिवसांचा पॅरोल देण्यास राज्य सरकारचा विरोध केला आहे. तसेच सालेमला इतका मोठा पॅरोल देणं शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मत मांडलं होतं. सालेमला पोलीस संरक्षणात दोनच दिवसांचा पॅरोल मिळू शकेल अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे वकीलांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच त्याला उत्तर प्रदेशातील आझमगडला जावे लागल्याने 2 दिवसाचा पॅरोल पुरेसा होणार नाही,असे सालेमच्या वकील कोर्टात सांगितले आहे.
advertisement
अबू सालेमने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा मोठा भाऊ अबू हकिम अन्सारी यांचे नोव्हेंबरमध्ये निधन झाल्याचे कारण देत पॅरोलसाठी याचिका दाखल केली होती. पण न्यायलयात ख्रिसमसच्या सुट्टीमुळे त्याची याचिका लांबली असल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते.
advertisement
1993 च्या मुंबई स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला सालेम २० वर्षांपासून कारागृहात बंद आहे. सालेमने म्हटले होते की, तो नोव्हेंबर 2005 मध्ये अटक झाल्यापासून तुरूंगातच आहे आणि त्याची आई आणि सावत्र आईच्या मृत्यूनंतर त्याला फक्त काही दिवसांचा पॅरोल मिळाला होता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
अबु सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, 14 दिवस पॅरोल शक्यच नाही, राज्य सरकारने मांडली कोर्टात भूमिका
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement