Team India : सुंदरने कॅप्टनचं टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कप टीममध्ये कोण घेणार जागा? 5 खेळाडूंमध्ये रेस!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी आयुष बदोनीला टीममध्ये स्थान मिळालं आहे.
advertisement
advertisement
वॉशिंग्टन सुंदरच्या बरगडीला दुखापत झाली आहे. सुंदर वेळेत फिट झाला नाही, तर निवड समितीला टी-20 वर्ल्ड कपसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. भारतातले बहुतेक स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर हे डावखुरे आहेत, ज्यात कृणाल पांड्या, शाहबाज अहमद आणि अनुकूल रॉय यांचा समावेश आहे. टीममध्ये आधीच अक्षर पटेल असल्यामुळे आणखी एका डावखुऱ्या स्पिन ऑलराऊंडरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
advertisement
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सुंदरसारखा खेळाडू लागेल, जो सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर बॅटिंग आणि स्पिन बॉलिंग करू शकेल. लेग स्पिनर विप्राज निगम याचा विचारही निवड समिती करू शकते. विप्राज हा खालच्या क्रमांकाचा धोकादायक बॅटर आणि उत्कृष्ट लेग स्पिनर आहे. विप्राज आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो.
advertisement
अनुभवी ऑलराऊंडरला संधी द्यायची असेल तर टीम इंडियासमोर नितीश रेड्डी हा सर्वोत्तम पर्याय आहे. टीममध्ये आधीच 3 स्पिन बॉलर आहेत, अशा परिस्थितीमध्ये नितीश रेड्डीचा विचार गेला जाईल. टीममध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत, पण दोघांसाठी रेड्डीचा पर्याय असणं, गैरसोयीचे ठरणार नाही.
advertisement
advertisement








