लग्नाचं स्वप्न पडलं महागात! 'त्या' तरुणीने लावला 6 लाखांना चुना; म्हणाली होती, "आपण लग्न करू आणि..."

Last Updated:

Ratnagiri News : संगमेश्वरचा मुलगा आणि ठाण्याची मुलगी या दोघांचं एका विवाह संकेतस्थळावरून सूत जुळलं. ते एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान मुलीने मार्च 2025 ते ऑगस्ट 2025 या...

Ratnagiri News
Ratnagiri News
Ratnagiri News : संगमेश्वरचा मुलगा आणि ठाण्याची मुलगी या दोघांचं एका विवाह संकेतस्थळावरून सूत जुळलं. ते एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान मुलीने मार्च 2025 ते ऑगस्ट 2025 या काळात किरकोळ खर्चासाठी, अपेंडिस ऑपरेशनसाठी आणि एम्ब्राॅयडरीची मशीन घेण्यासाठी मुलाकडून तब्बल 6 लाख 62 हजार 610 रुपये घेतले. लग्नाचे आमिष दाखवून संबंधित मुलीने आपली फसवणूक केली आहे, अशी तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात या मुलाने केलेली तक्रार केलेली आहे. त्यानुसार मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीने लग्नाचे दाखवले आमिष अन्...
सविस्तर वृत्त असे की, अमरावती/नागपूर येथील एका विवाह संकेतस्थळावर नितीन प्रकाश बांबाडे (वय-32, कळबंस्ते-विरतवाडी) याने बायोडाटा भरला. त्यानंतर विवाह संस्थेकडून प्रियंका विनोद लोणारे (रा. ठाणे) या मुलीचा बायोडाटा देण्यात आला. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं. त्यानंतर एकमेकांशी बोलू लागले. प्रियंकाने आपण दोघे लग्न करून असंही सांगितलं. दरम्यान 6 मार्च 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या दरम्याने प्रियंकाने नितीनकडून वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वेळी पैसे घेतले.
advertisement
6 लाखांची केली लूट
किरकोळ खर्चासाठी, अपेंडिस ऑपरेशनसाठी आणि एम्ब्राॅयडरीची मशीन घेण्यासाठी सुरूवातील 3 लाख 13 हजार 610 आणि दुसऱ्यावेळी 3 लाख 49 हजार, अशी एकून 6 लाख 62 हजार 610 रुपये प्रियंकाने नितीनकडून घेतली आहे. तिने ही रक्कम परत करतो म्हणून घेतली होती. मात्र ही रक्कम अजून परत केलेली नाही. त्यामुळे नितीनने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाचं स्वप्न पडलं महागात! 'त्या' तरुणीने लावला 6 लाखांना चुना; म्हणाली होती, "आपण लग्न करू आणि..."
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement