दारुड्या भावांचा सैतानी खेळ! पत्नीला अश्लील शिवीगाळ, पतीच्या पोटात खुपसला चाकू; संसार आणला रस्त्यावर

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : खाद्यपदार्थ विक्रीची हातगाडी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दाम्पत्याला दोन दारूड्या भावांनी जबर मारहाण केली. पत्नी अश्लील...

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : खाद्यपदार्थ विक्रीची हातगाडी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दाम्पत्याला दोन दारूड्या भावांनी जबर मारहाण केली. पत्नी अश्लील शिवीगाळ केली, तर पतीच्या पोटात हातागाड्यावरील चाकून खुपसून गंभीर जखमी केले. या दोघा भावांनी हातगाड्यावरील साहित्य रस्त्यावर टाकून दिले, तर दाम्पत्याचा मोबाइलही फोडून टाकला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी सिडको परिसरात घडली.
विनाकारण काढली भांडणं आणि केला चाकू हल्ला
सविस्तर माहिती अशी की, 26 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30 वाजता सिडको बसस्थानक परिसरात हातगाड्यावर एक दाम्पत्य खाद्यपदार्थांची विक्री करत होतं. त्याचवेळी अक्षय पाटील आणि त्याचा भाऊ दारूच्या नशेत या परिसरात आले. कारण नसताना दोघांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या पती-पत्नीला वाद घालण्यास सुरूवात केली. "नाश्त्याच्या प्लेटमधील कचरा का काढला नाही", म्हणत त्या 22 वर्षीय विवाहित महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
advertisement
साहित्याची केली नासधूर अन् विवाहितेला शिवीगाळ
इतकंच करून हे 2 दारूडे शांत बसले नाहीत. तर त्यांच्याच गाड्यावर चाकू घेतला आणि पतीच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. पत्नी पतीला सावरत होती, त्याचवेळी या दारूड्यांनी हातगाड्यावरील साहित्याची नासधूस केली आणि दाम्पत्याचा मोबाईलही फोडली. या गंभीर घटनमुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोपी अक्षय पाटील याच्यापूर्वीही 2 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
दारुड्या भावांचा सैतानी खेळ! पत्नीला अश्लील शिवीगाळ, पतीच्या पोटात खुपसला चाकू; संसार आणला रस्त्यावर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement