देव तारी त्याला कोण मारी! मृत्यूच्या दाढेतून 'हे' बाळ तीनदा परतलं; CCTV तपासले आणि पोलिसही चक्रावले

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News : नवऱ्यापासून विभक्त महिलेने एकटीने बाळाला जन्म दिला. स्वतःच बाळाची नाळ कापली.  कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी त्या बाळाला गोणीत...

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : नवऱ्यापासून विभक्त महिलेने एकटीने बाळाला जन्म दिला. स्वतःच बाळाची नाळ कापली.  कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी त्या बाळाला गोणीत गुंडाळलं आणि रस्त्यावरच्या कचऱ्यात फेकून दिलं. पहाटेच्या थंडी कुत्र्यांनी दोनदा गोणीचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाहीतर गोणी बसखालीही आली. तीनदा संकटं येऊन हे नवजात बाळ वाचलं. आजुबाजुच्या लोकांमुळे हे बाळ सुखरूप राहिले. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे 5.30 वाजता पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर घडली.
बाळ गोणीत गुंडाळलं होतं अन् कुत्री लचके तोडीत होती
समोर आलेली माहिती अशी की, पाटबंधारे जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक असणारे भाग्येश पुसदेकर (वय-28) हे गुरूवारी पहाटे गावावरून शहराकडे पायीच निघाले होते. पुंडलिकनगरधील रस्त्यावरून चालत असताना दुभाजकावरील कचऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळ असलेली गोणीचे कुत्रे लचके तोडत होते. त्या ओढाताणीत ती गोणी बसच्या दोन चाकांच्या मध्ये आली. त्याता बाळाच्या छातील दोन दात लागले. भाग्येश यांनी जवळ जाऊन कुत्र्यांना हाकलून लावले. इतक्यात माॅर्निंग वाॅकसाठी आलेले नागरिक गोळा झाले. त्यांनी कचऱ्याच पडलेल्या गोणीची गाठ सोडली, तर रक्ताने माखलेले बाळ रडताना दिसले. नागरिकांमध्ये एका वयस्क महिलेने चादर आणली आणि त्या बाळाला गुंडाळली. नागरिकांना उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात नेण्याच प्रयत्न केला. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे बाळाला घाटीत दाखल करण्यात आले.
advertisement
खोलीत एकटीनेच दिला बाळाचा जन्म
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित 24 वर्षांची तरुणी दीड वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. तिचे 12 वीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. ही तरूणी एका कंपनीत काम करून पुंडलिकनगरमध्ये एकटीच राहते. अनैतिक संबंधात हे बाळ जन्माला आल्याचा संशय पोलिसांनी आहे. तिच्या म्हणण्यानुसार खोलीत एकटीनेच बाळाला जन्म दिला. पोलिसांना तिच्या खोलीतून औषधे खरेदी केल्याची काही कागदपत्रं मिळालेली आहेत.
advertisement
पोलिसांनी असं शोधलं आरोपी मातेला
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर आणि अर्जुन राऊत यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पहाटे 3.30 वाजताचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यात एक तरुणी कचऱ्यात बाळ फेकून एका बोळीत जाताना दिसली. पोलिसांनी कपडे आणि चपलांवरून तरुणीचा शोध सुरू केला. 40 पेक्षा जास्त घरांमध्ये चौकशी केली. त्यात गर्भवती तरुणी एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी करताच तिनेच हे क्रूर कृत्य केल्याचे कबूल केले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
देव तारी त्याला कोण मारी! मृत्यूच्या दाढेतून 'हे' बाळ तीनदा परतलं; CCTV तपासले आणि पोलिसही चक्रावले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement