advertisement

Satara ZP Election:'ऑपरेशन लोट्स'मध्ये शिंदे-राष्ट्रवादीचाच गेम, सातारा जिल्हा परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा, एका मतानं 'कमळ' फुललं

Last Updated:

Satata ZP News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येऊन तगडे आव्हान दिले होते, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपने 'ऑपरेशन लोट्स' राबवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.

'ऑपरेशन लोट्स'मध्ये शिंदे-राष्ट्रवादीचाच गेम, सातारा जिल्हा परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा, एका मतानं 'कमळ' फुललं
'ऑपरेशन लोट्स'मध्ये शिंदे-राष्ट्रवादीचाच गेम, सातारा जिल्हा परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा, एका मतानं 'कमळ' फुललं
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा: गेल्या महिनाभरापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या हाय-व्होल्टेज ड्रामाचा अखेर भाजपच्या विजयाने थरारक शेवट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येऊन तगडे आव्हान दिले होते, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपने 'ऑपरेशन लोट्स' राबवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.

शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साताऱ्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे. भाजपकडे केवळ २७ सदस्य असतानाही त्यांनी बहुमताचा आकडा गाठून विरोधकांना चकित केले.
advertisement
सातारा जिल्हा परिषदेत भाजप हा २७ जागांवर विजयी झाला होता. साताऱ्यात हा मोठा पक्ष ठरला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या. तर, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती.

एका मतानं कमळ फुललं

आज झालेल्या मतदानात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना ३३ तर मनीषा फडतरे यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या प्रिया शिंदे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांना ३३ मते मिळाली. निवडीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
advertisement

अदृश्य हातांची मदत आणि फोडाफोडीची चर्चा

हा विजय भाजपसाठी जेवढा आनंददायी आहे, तेवढाच तो राष्ट्रवादीचे नेते, मंत्री मकरंद पाटील आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून काही सदस्यांची मते फुटल्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. मतदानाच्या आधी सदस्यांची पळवापळवी झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ऐनवेळी समीकरणे बदलल्याने शिंदे गट-राष्ट्रवादीच्या रणनीतीचा पुरता फज्जा उडाला असून साताऱ्यात पुन्हा एकदा 'कमळ' फुलले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara ZP Election:'ऑपरेशन लोट्स'मध्ये शिंदे-राष्ट्रवादीचाच गेम, सातारा जिल्हा परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा, एका मतानं 'कमळ' फुललं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement