पाया घसरला अन् 350 फूट खोल दरीत कोसळले डॉक्टर; डोळे उघडताच समोर घनदाट झाडी अन् अंधार , मग...सिंहगड किल्ल्यावरील थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
निसरड्या वाटेवरून चालताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि काही कळायच्या आत ते थेट ३५० फूट खोल दरीत कोसळले. इतक्या उंचावरून पडल्यामुळे ते काही वेळ बेशुद्ध होते.
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर गुरुवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ट्रेकिंगसाठी गेलेले डॉ. प्रशांत नदावते हे बुधलामाची परिसरात सुमारे ३०० ते ३५० फूट खोल दरीत कोसळले. मृत्यू डोळ्यासमोर दिसत असतानाही, डॉक्टरांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि बचाव पथकाचे अचाट धाडस यामुळे एका मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
डॉ. प्रशांत नदावते हे दुपारी ४ च्या सुमारास सिंहगड घाटातील बुधलामाची परिसरात फिरत होते. निसरड्या वाटेवरून चालताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि काही कळायच्या आत ते थेट ३५० फूट खोल दरीत कोसळले. इतक्या उंचावरून पडल्यामुळे ते काही वेळ बेशुद्ध होते. मात्र, शुद्धीवर आल्यावर त्यांनी हार मानली नाही. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि तातडीने पोलीस कंट्रोल रूमला फोन करून स्वतःचे लोकेशन कळवले.
advertisement
२ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच हवेली पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. घनदाट झाडी, अंधार आणि उभ्या कड्याचे आव्हान पेलत तब्बल अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टरांना स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.
advertisement
सिंहगड परिसरात सध्या निसरड्या वाटांमुळे ट्रेकिंग करणे धोकादायक ठरत आहे. मात्र, डॉ. नदावते यांचा मोबाईल चार्ज असणे आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी कॉल करणे त्यांच्यासाठी जीवदान ठरले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 1:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पाया घसरला अन् 350 फूट खोल दरीत कोसळले डॉक्टर; डोळे उघडताच समोर घनदाट झाडी अन् अंधार , मग...सिंहगड किल्ल्यावरील थरार






