नवी मुंबईत होऊ घातलेल्या नवीन रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या नामकरणावरून महायुतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला 'गुरु तेग बहादूर' यांचे नाव देण्याची घोषणा केली होती, मात्र याच घोषणेवरून नवी मुंबई महासभेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.



