advertisement

रोज मित्राच्या घरी झोपायला जायचा, त्या दिवशी नशेत गेला अन्.., धक्कादायक कृत्यानं संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: दोघांत वाद झाल्यानंतर विजय उगले हा अविनाशच्या घरी जाऊन त्याच्या भावाला समज देत होता.

रोज घरी झोपायला जायचं, त्या दिवशी नशेत गेला अन्.., धक्कादायक कृत्यानं संभाजीनगर हादरलं!
रोज घरी झोपायला जायचं, त्या दिवशी नशेत गेला अन्.., धक्कादायक कृत्यानं संभाजीनगर हादरलं!
छत्रपती संभाजीनगर: घरात झोपायला येणाऱ्या एकाला येऊ नको म्हणून सांगितले. त्यामुळे त्याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. अविनाश दिलीप जाधव असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. हिमायतबाग परिसरातील भीमराजनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय कृष्णा उगले (24) हे आपल्या भावासोबत राहतात. त्यांच्या ओळखीचा अविनाश जाधव हा मागील काही महिन्यांपासून रात्री त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत होता. मात्र 16 मार्च रोजी रात्री उशिरा अविनाश दारूच्या नशेत घरी आला. तेव्हा विजयने त्याला पुन्हा घरी येऊ नको असे सांगितले. यावरून दोघांत वाद झाला.
advertisement
दरम्यान, दोघांत वाद झाल्यानंतर विजय उगले हा अविनाशच्या घरी जाऊन त्याच्या भावाला समज देत होता. तेव्हा अविनाश त्या ठिकाणी आला आणि हातातील लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्याने जबड्यावर आणि डोक्यावर मागून प्रहार केला. यामध्ये विजय गंभीर जखमी झाला. या जखमी अवस्थेतच त्याला घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून सहा टाके घालण्यात आले.
advertisement
याप्रकरणी विजयने बेगमपुरा पोलिसांत धाव घेतली. गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रोज मित्राच्या घरी झोपायला जायचा, त्या दिवशी नशेत गेला अन्.., धक्कादायक कृत्यानं संभाजीनगर हादरलं!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement