advertisement

धक्कदायक! फक्त एका शब्दाचा राग आला अन्...; पुण्यात दोन तरुणांचा वॉचमनवर जीवघेणा हल्ला, काय घडलं?

Last Updated:

दोन तरुण दारूच्या नशेत धुंद होऊन सोसायटीच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न करत होते. 'तुम्ही नशेत आहात, त्यामुळे आत जाऊ नका', असे म्हणत कर्तव्यावर असलेल्या वॉचमनने त्यांना रोखले.

तरुणांचा वॉचमनवर जीवघेणा हल्ला
तरुणांचा वॉचमनवर जीवघेणा हल्ला
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून पुन्हा एकदा एक संतापजनक आणि माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. हडपसर-मोहम्मदवाडी परिसरातील एका सोसायटीत केवळ आत सोडले नाही या कारणावरून दोन मद्यधुंद तरुणांनी सुरक्षा रक्षकाला काठीने रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण केली. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना काळेपडळ पोलीस चौकीच्या हद्दीतील एका सोसायटीच्या गेटबाहेर रात्री साडेसातच्या सुमारास घडली. दोन तरुण दारूच्या नशेत धुंद होऊन सोसायटीच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न करत होते. 'तुम्ही नशेत आहात, त्यामुळे आत जाऊ नका', असे म्हणत कर्तव्यावर असलेल्या वॉचमनने त्यांना रोखले. मात्र, या साध्या विनंतीचा राग अनावर झाल्याने या तरुणांनी थेट हातात काठ्या घेतल्या आणि वॉचमनवर तुटून पडले.
advertisement
बघ्यांची गर्दी, पण मदतीचा हात नाही
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन तरुण भररस्त्यात वॉचमनला काठीने बेदम मारत आहेत. वॉचमनमदतीसाठी ओरडत होता. काही लोकांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत असलेल्या तरुणांनी कोणाचेही ऐकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, इतर लोक बराच वेळ प्रयत्न करत होते आणि या तरुणांच्या हातातील काठी ओढत होते, मात्र तरीही या दोघांनी कोणाचंही ऐकलं नाही.
advertisement
काळेपडळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यात वाढत्या गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धक्कदायक! फक्त एका शब्दाचा राग आला अन्...; पुण्यात दोन तरुणांचा वॉचमनवर जीवघेणा हल्ला, काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement