TRENDING:

ती बाहेरुन साधी चहाची टपरी, पण आत लपलं होतं मोठं रहस्य, पोलीसांना तपासात जे दिसलं ते धक्कादायक

Last Updated:

आता असं म्हटल्यावर तुम्ही विचार करत असाल की असं चहाच्या टपरीवर मिळालं तरी काय? मग ही बातमी वाचा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत लोकांना कोणत्याही वेळेला चहा चालतो. मग ती सकाळ असोत, दुपार की संध्याकाळ... चहाची टपरी नेहमीच गजबजलेली असते. चहाच्या दुकानात आपल्याला सामान्यता चहाच मिळते. पण एका चहाच्या दुकानात अशी काही गोष्ट मिळाली आहे की ते पाहून सगळेच हादरुन गेले.
AI generated Photo
AI generated Photo
advertisement

आता असं म्हटल्यावर तुम्ही विचार करत असाल की असं चहाच्या टपरीवर मिळालं तरी काय? खरंतर हे चहाचं दुकान म्हणजे एक गुन्हेगारी अड्डा होता. जिथे पैसे आणि शस्त्र लपवण्यात आले होते. हे प्रकरण तेलंगणामध्ये समोर आलं आहे.

तेलंगणातील जगैयापेट येथे पोलिसांनी छापा टाकून तब्बल 80 लाख रुपये रोख रक्कम आणि काही शस्त्रं जप्त केली आहेत. ही कारवाई ‘राजस्थान टी स्टॉल’ नावाच्या एका चहाच्या दुकानात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली.

advertisement

ही कारवाई मिर्यालगुडा (नलगोंडा) येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणाशी जोडली जात आहे. तिथल्या एका हॉटेलमधून 80 लाख रुपये चोरीला गेले होते. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यावरून आरोपींचा माग काढला. तपासात समोर आलं की आरोपी जगैयापेटमध्ये चहाचं दुकान चालवत होते.

यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुकान आणि परिसराची तपासणी केली. त्यावेळी तिथे लपवलेले पैसे आणि शस्त्रं सापडले. पोलिसांनी सांगितलं की ही संपूर्ण कारवाई अतिशय काळजीपूर्वक पार पाडण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

सध्या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आणखी कोणते लोक चोरीत सामील होते का, हे शोधलं जात आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चौकशीत हेही समोर आलं की आरोपींनी चोरीची रक्कम लपवण्यासाठी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी चहाच्या दुकानाचा वापर केला होता.

मराठी बातम्या/क्राइम/
ती बाहेरुन साधी चहाची टपरी, पण आत लपलं होतं मोठं रहस्य, पोलीसांना तपासात जे दिसलं ते धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल