जखमी युवकाचं नाव शौकत शेख (वय 35) आहे. त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून डोक्यातून चाकू काढून टाकला असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
काय घडलं नेमकं?
प्राथमिक माहितीनुसार, शौकत शेख आणि त्याचा मित्र पांडुरंग थोरात हे दोघे एकत्र बसून मद्यपान करत होते. याचवेळी दारूसाठी पैसे देण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की संतप्त पांडुरंगने जवळचा चाकू काढून थेट शौकतच्या डोक्यात खुपसला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
advertisement
चाकू डोक्यात अडकलेला असतानाही शौकतने धाडसाने स्वतः हॉस्पिटल गाठलं. त्याची स्थिती पाहून डॉक्टरही हादरले. जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. शेख साबीर यांनी सांगितले की, "रुग्ण गंभीर अवस्थेत होता. चाकू खोलवर घुसला होता. आमच्या आपत्कालीन शस्त्रक्रिया टीमने वेळेवर चाकू काढून उपचार सुरू केले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे."
आरोपी फरार, पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी पांडुरंग थोरात सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
