TRENDING:

31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतं, ‘हँगओव्हर’ झालंय? लगेच करा हे घरगुती उपाय, Video

Last Updated:

Health Tips: अति मद्यपानानंतर काही तासांनी शरीरात 'हँगओव्हर'ची लक्षणे दिसू लागतात. यात प्रामुख्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे यांचा समावेश होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: 31 डिसेंबरला काहीजण मद्यपान करतात. कधीकधी प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल म्हणजेच दारू घेतली जाते. त्याचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. अति दारू पिल्यामुळे गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अति दारू प्यायल्यास धोका टाळण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती दिलीये.
advertisement

अल्कोहोल किंवा दारूचे सेवन हे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. अनेकदा सण-समारंभ किंवा आग्रहाखातर मद्यपान केले जाते, परंतु त्याचे दूरगामी परिणाम यकृत आणि मेंदूवर होत असल्याचे समोर आले आहे.

एकच प्याला..! महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?

कर्करोग आणि यकृताच्या आजारांचा धोका

advertisement

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोल हे ‘ग्रुप 1’ कार्सिनोजेनमध्ये मोडते. ज्याप्रमाणे तंबाखूमुळे कर्करोगाचा धोका असतो, तसाच धोका दारूमुळेही संभवतो. याशिवाय, सततच्या मद्यपानामुळे यकृताचे गंभीर आजार आणि चेतासंस्थेचे विकार जडण्याची शक्यता असते. यामुळे शरीराचा समतोल बिघडणे आणि हालचालींवर नियंत्रण न राहणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

हँगओव्हरची लक्षणे आणि घरगुती उपाय

अति मद्यपानानंतर काही तासांनी शरीरात 'हँगओव्हर'ची लक्षणे दिसू लागतात. यात प्रामुख्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे यांचा समावेश होतो. या त्रासातून आराम मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी खालील उपाय सांगितले आहेत.

advertisement

भरपूर पाणी प्या: दारूमुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते, त्यामुळे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

लिंबू आणि नारळ पाणी: शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी लिंबू पाणी किंवा नारळ पाण्याचे सेवन करावे.

विश्रांती: शरीराला पूर्वपदावर येण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि झोप घेणे आवश्यक आहे.

संतुलित आहार: हँगओव्हरच्या स्थितीत सकस आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्यावा.

advertisement

काय टाळावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतं, ‘हँगओव्हर’ झालंय? लगेच करा हे उपाय, V
सर्व पहा

अनेकजण हँगओव्हर उतरवण्यासाठी पुन्हा अल्कोहोल घेण्याचा चुकीचा प्रयत्न करतात, मात्र असे करणे आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते. जर उलट्या किंवा डिहायड्रेशनचा त्रास जास्त प्रमाणात होत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतं, ‘हँगओव्हर’ झालंय? लगेच करा हे घरगुती उपाय, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल