हत्येनंतर राम बहादूरने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हेमलताचं सामान गायब केलं आणि इतर पुरावे नष्ट केले. यानंतर त्यांनी दरोड्यासाठी हा खून झाल्याची कहाणी रचली. या खुलाशानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. 14 मे रोजी शाहीच्या बकनिया वीरपूर गावात राहणाऱ्या हेमलता यांची डंका चौकीजवळ दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. महिलेचा खून आणि त्यानंतर दरोड्याच्या प्रकाराने खळबळ उडाली.
advertisement
घटनेतील तफावत आणि राजकुमारच्या कथेमुळे तो पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात आला. कडक चौकशी केली असता त्याने संपूर्ण माहिती दिली. शाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमारने सांगितलं की, त्याचे लग्न हेमलतासोबत मे 2023 मध्ये झाले होते. त्यांचे संबंध काही दिवस चांगले राहिले पण मधल्या काळात अनेकदा पत्नी मोबाईलवर बोलताना दिसायची. तिला रील बनवण्याचीही आवड होती, जी तिच्या पतीला आवडत नव्हती.
यावरून अनेकदा भांडण झालं. काही महिन्यांपूर्वी मी त्याने पत्नीला तिच्या दाजीसोबत बोलताना पकडलं. त्यावरून वादही झाला होता. हेमलता हिने यापुढे बोलणार नाही असं वचन दिलं. पण जेव्हा तो घराबाहेर असायचा तेव्हा ती गुपचूप बोलायची. मार्चमध्ये त्याने तिला पुन्हा फोनवर बोलताना पकडलं. त्यानंतर रागाच्या भरात त्याने मोबाईल फोडला. त्याने तिच्या मोबाईलमध्ये स्वतःचं सिम टाकलं आणि ते वापरू लागला. वादामुळे पत्नी अनेकदा माहेरच्या घरी राहायची.
ट्रेन सुटली म्हणून पुन्हा घरी आला नवरा; दरवाजा उघडताच सरकली पायाखालची जमीन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमारने सांगितलं की, त्याला दीड महिन्यांपूर्वी पत्नीच्या गर्भधारणेची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्यावरील संशय अधिकच बळावला. कदाचित तिच्या पोटात माझं मूल नसेल, असं त्याला वाटू लागलं. यानंतर तो खूप दुःखी होता. अखेर त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला.
खून करण्यासाठी आरोपीने मिरची विकून पिस्तूल आणि काडतुसे घेतली. पत्नीला संशय येऊ नये म्हणून त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. प्रत्येक मागणी पूर्ण करण्यास सुरुवात केली. घटनेच्या एक दिवस आधी तो पत्नीला तिच्या माहेरच्या घरी आणि तिच्या इच्छेनुसार मावशीच्या घरी घेऊन गेला. खरेदीही झाली. मग ठरल्याप्रमाणे 14 मे च्या संध्याकाळी अंधार पडेल अशा वेळी दोघं घराकडे निघाले. मात्र, गावाकडे वळण्याऐवजी त्याने डावीकडे कच्चा रस्ता धरला.
पत्नीने प्रश्न विचारला असता त्याने मिरचीच्या शेतात फिरायला जाणार असल्याचे सांगितले. यानंतर मोटारसायकल कच्च्या रस्त्यावरील रिकाम्या शेतात उभी केली. यानंतर काही वेळातच पोटात वाढणाऱ्या मुलावरून वाद सुरू झाला. हेमलताला काही समजण्यापूर्वीच राजकुमारने पिस्तूल काढून तिच्या छातीत गोळी झाडली. ती पडल्यानंतर दुसरी गोळी तिच्या मानेजवळ लागली. घटनेत महिलेचा मृत्यू झाला.
