TRENDING:

आधी मूव्ही दाखवला, मग फ्लॅटवर नेलं, सांगलीत MBBS विद्यार्थिनीवर क्लासमेटकडून सामूहिक अत्याचार

Last Updated:

Crime in Sangli: महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. इथं एका MBBS च्या विद्यार्थिनीवर तिच्यावर वर्गातील मित्रांनी सामूहिक अत्याचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या विविध घटना घडल्या आहेत. सध्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण प्रचंड गाजत असून संपूर्ण राज्यभरात यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. इथं एका MBBS च्या विद्यार्थिनीवर तिच्यावर वर्गातील मित्रांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला आधी चित्रपट दाखवला. त्यानंतर तिला फ्लॅटवर घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे.
News18
News18
advertisement

अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. विनय विश्वेष पाटील (२२, सोलापूर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (२०, पुणे) व तन्मय सुकुमार पेडणेकर (२१, सांगली) अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. अटकेनंतर आरोपींना न्यायालयत हजर केलं असता, आरोपींना कोर्टानं २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आरोपींचा कसून चौकशी करत आहेत.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी ही घटना घडली. त्या दिवशी पीडित विद्यार्थिनी ही आरोपींसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर आरोपी तिला गोड बोलून आपल्या फ्लॅटवर घेऊन गेले होते. याठिकाणी आरोपींनी विद्यार्थ्यांनीला थंड पेयातून गुंगीचे औषध पाजलं. पीडितेची शुद्ध हरपल्यानंतर तिन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

काहीवेळाने पीडित विद्यार्थिनी शुद्धीवर आली. त्यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिने झालेल्या प्रकाराबाबत आरोपींना जाब विचारला. पण आरोपींनी तिला दमदाटी केली. शिवाय या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारेन, अशी धमकी दिली. या धमकीनंतर पीडितेनं घडलेला सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तिन्ही आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. तसेच अवघ्या काही तासांत तिघांनाही अटक केली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
आधी मूव्ही दाखवला, मग फ्लॅटवर नेलं, सांगलीत MBBS विद्यार्थिनीवर क्लासमेटकडून सामूहिक अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल