बाळ गोणीत गुंडाळलं होतं अन् कुत्री लचके तोडीत होती
समोर आलेली माहिती अशी की, पाटबंधारे जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक असणारे भाग्येश पुसदेकर (वय-28) हे गुरूवारी पहाटे गावावरून शहराकडे पायीच निघाले होते. पुंडलिकनगरधील रस्त्यावरून चालत असताना दुभाजकावरील कचऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळ असलेली गोणीचे कुत्रे लचके तोडत होते. त्या ओढाताणीत ती गोणी बसच्या दोन चाकांच्या मध्ये आली. त्याता बाळाच्या छातील दोन दात लागले. भाग्येश यांनी जवळ जाऊन कुत्र्यांना हाकलून लावले. इतक्यात माॅर्निंग वाॅकसाठी आलेले नागरिक गोळा झाले. त्यांनी कचऱ्याच पडलेल्या गोणीची गाठ सोडली, तर रक्ताने माखलेले बाळ रडताना दिसले. नागरिकांमध्ये एका वयस्क महिलेने चादर आणली आणि त्या बाळाला गुंडाळली. नागरिकांना उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात नेण्याच प्रयत्न केला. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे बाळाला घाटीत दाखल करण्यात आले.
advertisement
खोलीत एकटीनेच दिला बाळाचा जन्म
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित 24 वर्षांची तरुणी दीड वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. तिचे 12 वीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. ही तरूणी एका कंपनीत काम करून पुंडलिकनगरमध्ये एकटीच राहते. अनैतिक संबंधात हे बाळ जन्माला आल्याचा संशय पोलिसांनी आहे. तिच्या म्हणण्यानुसार खोलीत एकटीनेच बाळाला जन्म दिला. पोलिसांना तिच्या खोलीतून औषधे खरेदी केल्याची काही कागदपत्रं मिळालेली आहेत.
पोलिसांनी असं शोधलं आरोपी मातेला
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर आणि अर्जुन राऊत यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पहाटे 3.30 वाजताचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यात एक तरुणी कचऱ्यात बाळ फेकून एका बोळीत जाताना दिसली. पोलिसांनी कपडे आणि चपलांवरून तरुणीचा शोध सुरू केला. 40 पेक्षा जास्त घरांमध्ये चौकशी केली. त्यात गर्भवती तरुणी एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी करताच तिनेच हे क्रूर कृत्य केल्याचे कबूल केले.
हे ही वाचा : Nashik News: बैलाने दिली धडक, पुतण्या पडला विहिरीत, वाचविण्यासाठी काकाने मारली उडी, पण...
हे ही वाचा : बहिणीच्या छळाचा घेतला बदला! वाटेतच जावयाला गाठलं अन् सुपारी देऊन मेहुण्याने संपवलं, वाचा सविस्तर
