मुंबईच्या गोरगावमधील आरे कॉलनीत ही भयानक घटना घडली आहे. या घटनेतील राजश्री अहिरे या महिलेचे चंद्रशेखर नावाच्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात राजश्रीचा पती भरत अहिरे हा अडसर ठरत होता.त्यामुळे तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून त्याचा काटा काढण्याचा प्लान रचला होता.
भरत अहिरे पेशाने मेकअप आर्टीस्ट होता त्यामुळे फिल्म सिटीत काम करायचा.काम आटोपून भरत घरात आल्यानंतर बायकोने राजश्रीने प्रियकर आणि त्याच्या भावाला बोलावून घेतले होतं.यावेळी भरत यांच्या 12 वर्षीय लेकीने दिलेल्या जबाबानुसार आई (राजश्रीने) बाबांना बाथरूम जवळ बोलावून घेतलं. बाथरूमजवळ जाताच प्रियकर आणि त्याच्या भावाने भरत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सूरूवात केली होती. या मारहाणीत भरत अहिरे यांना शरीरावर गंभीर इजा झाल्या.
advertisement
या मारहाणीनंतर राजश्रीने भरत यांना या घटनेची वाच्यता कुठेही केल्यास तु्झ्या मुलीला देखील मारून टाकेन, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर राजश्रीने तब्बल तीन दिवस भरत अहिरेला घरातच ठेवले त्याच्यावर उपचार देखील केले नाही.पण प्रकृती बिघडल्यानंतर त्याला 16 जुलैला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये पाच मोठे ऑपरेशन करून देखील 5 ऑगस्टला भरत अहिरे यांचा मृत्यू झाला होता.
माझ्या मुलाला मारून मारून त्याची हत्या करण्यात आली.जिच्यासोबत आयुष्य काढण्याची स्वप्न पाहिलं तिने त्याला मारलं असा आरोप भरतच्या आईने केला होता. यानंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी तक्रार दाखल करून बायको राजश्री हिरे आणि प्रियकराचा भाऊ रंगाला अटक केली. तर मुख्य आरोपी प्रियकर प्रेमी चंद्रशेखर फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.
