नेमकं प्रकरण काय?
माहीममध्ये राहणारी महिला सोशल मीडियावर सवलतीत मिळणाऱ्या विमानसेवेची माहिती शोधत होती. तेव्हा झोमुंक नावाच्या जाहिरातीने तिचे लक्ष वेधले. या वेबसाईटवर प्रीमियम सर्व्हिस घेतल्यास स्वस्तात विमान तिकिटे मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी एका अनोळखी क्रमांकावरून तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली.
लेकीला पायलट व्हायचं होतं; वडिलांनीही दिली साथ, पण पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत 2 वर्षात भयंकर घडलं
advertisement
संबंधित महिलेने 12 फेब्रुवारी रोजी सर्व्हिसेस घेण्यासाठी ‘जी - पे'द्वारे 1499 रुपये भरले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिमानी हिने महिलेशी संपर्क साधला. झोमुंक वेबसाईटची ऑपरेशन हेड असल्याचे तिने सांगितले. तसेच विमानसेवा पाहण्यासाठी मोबाईलवर पाठवलेली लिंक ओपन करण्यास सांगितले. विमानसेवा पाहण्यासाठी महिलेने आलेली लिंक उघडताच मोबाइलवर अॅप डाऊनलोड झाले.
पासबुक एंट्री अन् सगळं उघड
महिलेने पासबुकची एंट्री केल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली. 14 ते 21 फेब्रुवारीदरम्यान महिलेच्या विविध बँक खात्यांतून 6 लाख 95 हजार रुपये परस्पर काढण्यात आले होते. मोबाईल नवीन घेतल्यामुळे संबंधित अॅपची माहिती उपलब्ध नसल्याचे महिलेने सांगितले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
