TRENDING:

मैत्री, पैसा आणि गर्लफ्रेंड...फ्लॅटमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं उलगडलं गूढ

Last Updated:

धक्कादायक! सरकारी कर्मचाऱ्याचा मित्रानेच केला खून, वाचा काय आहे नेमका प्रकार?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मृत व्यक्तीचं नाव महेश कुमार असून, ते सर्व्हे ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ सर्वेक्षक होते. दिल्ली पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, आरोपीनं महेश कुमार यांची हत्या कशा पद्धतीनं केली, याचा खुलासा केलाय.
दिल्ली क्राइम
दिल्ली क्राइम
advertisement

महेश कुमार यांच्या हत्येचा उलगडा करणं पोलिसांसाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं. पण पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणून मारेकऱ्याला जेरबंद केलं. मात्र या हत्येचा घटनाक्रम व त्यानंतर झालेला खुलासा अत्यंत धक्कादायक असून, तो एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच आहे. 28 ऑगस्ट 2023 महेश कुमार बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या पत्नीनं दिल्ली पोलिसांना दिली होती. महेश कुमार यांची कार एका मित्राकडे असल्याचेही पत्नीनं सांगितलं. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या वेळी पोलिसांना महेश यांची त्यांचा सहकारी अनीससोबत चांगली मैत्री असल्याची माहिती मिळाली. अनीसकडेच महेश यांची गाडी होती, हे देखील समोर आलं.

advertisement

पोलिसांनी महेशच्या पत्नीकडून तिचे दोन्ही मोबाइल क्रमांक घेतले, व महेश यांचा मोबाइल ट्रेस केला असता, त्यांचे शेवटचे लोकेशन दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबाद येथे सापडले. मात्र महेश यांचा पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी महेश यांचा मित्र अनीस याची चौकशी करण्याचं ठरवलं. चौकशीदरम्यान अनीस याने महेशबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी अनीसवर प्रश्नाचा भडिमार केला. जर तो तुमचा इतका चांगला मित्र आहे, तर तो कुठे जात आहे हे तुम्हाला का सांगितलं नाही? त्यांनी त्याची गाडी तुमच्याकडे का सोडली? त्याचे लोकेशन फरिदाबाद कसे येत आहे? असे अनेक प्रश्न अनीसला पोलिसांना विचारले. पण अनीसनं या प्रश्नांची अशी उत्तरं दिली की, पोलिसांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

advertisement

अनीसला नऊ लाख दिल्याचं समजलं, आणि...

तपासादरम्यान पोलिसांनी महेश यांच्या बँक अकाउंटची तपासणी केली. त्यानंतर महेश यांनी अनीसला नऊ लाख रुपये दिल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा अनीसचा संशय आला, व त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आलं. आरोपी अनीसनं महेश यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले होते. पण वास्तविक, अनीसनं महेश यांना फसवलं होतं. सरकारी खात्यात आपले ओळखीचे लोक आहेत आणि ते कोणालाही सरकारी कर्मचारी म्हणून नोकरी लावू शकतात, असं सांगत अनीसनं महेश यांच्याकडून तीन जणांना नोकरी लावण्यासाठी नऊ लाख रुपये घेतले होते. अखेर अनीसनं महेश यांचा खून केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी अनीसला अटक केली, व त्याने दिलेल्या माहितीवरून महेशचा मृतदेह त्याच्या मित्राच्या रिकाम्या फ्लॅटमधून जप्त केला.

advertisement

असा झाला खुनाचा उलगडा

मृत महेश कुमार यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन फरिदाबाद असल्याचं आढळून आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांची कार सरोजिनीनगरमध्ये उभी असल्याचं समोर आलं. अनीसकडे त्या गाडीच्या चाव्या असताना असं का घडलं? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी अनीसची कसून चौकशी केली असता या हत्येचे रहस्य उघड झालं. अनीसनं गुन्ह्याची कबुली दिली. अनीसनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्याच्या फ्लॅटच्या मागील बाजूस जमिनीत पुरलेला महेशचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहावर सिमेंटचा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला होता. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म बांधणाऱ्या प्लंबरला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं. या वेळी प्लंबरनं सांगितलं की, 'ज्या व्यक्तीनं हे प्लॅटफॉर्म बांधण्याचं काम करण्यास सांगितलं होतं, तो दिवसभर तेथेच उभा होता आणि त्याच्यासमोर सिमेंटचा प्लॅटफॉर्म बांधला गेला. संबंधित व्यक्ती मला फ्लॅटच्या मागच्या बाजूला घेऊन गेला, आणि तिथे एक लांब सिमेंटचा प्लॅटफॉर्म बांधायचा आहे, असं सांगितलं. मी त्यासाठी त्याच्याकडे 12 हजार मागितले असता त्याने 10 हजार दिले. जेव्हा मी त्या व्यक्तीला हे बांधकाम का करायचे आहे, असं विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की, त्याची पत्नी येणार असून येथे खूप पाणी साचते. त्यामुळेच तो हे काम करत आहे.'

advertisement

म्हणून रचला खुनाचा कट

चौकशीदरम्यान अनीसनं महेश यांच्या हत्येचा कट आणि कारण या दोन्ही गोष्टींचा उलगडा केला. महेश, अनीस आणि अनीसची मैत्रीण हे तिघेही एकाच ऑफीसमध्ये काम करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. महेश आणि अनीस दोघेही चांगले मित्र होते. यामुळेच एकदा अनीसला नऊ लाख रुपयांची गरज असताना महेश यांनी काहीही विचार न करता त्याला पैसे दिले. दरम्यान, अनीसची ऑफिसमधील एका मुलीशी मैत्री झाली. पण महेश यांची देखील अनीसच्या मैत्रिणीवर वाईट नजर होती. अनीसला हा प्रकार कळताच त्याने महेश यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण महेशला ते मान्य नव्हते. यावरून महेश आणि अनीस यांच्यात वाद झाला. यादरम्यान महेश यांनी अनीसला दिलेले 9 लाख रुपये मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनीसच्या मनात महेशबद्दल द्वेष निर्माण झाला होता, व यातूनच त्याने महेश यांचा खून करण्याचा कट रचला.

असा केला खून

अनीस आरकेपुरम येथील सेक्टर 2 मध्ये फ्लॅट क्रमांक 1121 मध्ये राहत होता. अनीसनं महेश यांचा खून करण्यासाठी 5 दिवसांची सुट्टी घेतली, व तो 27 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्या गावी सोनीपतला गेला. त्यानंतर तो परत आला, व त्याने बाजारातून 6 फुटांचे पॉलिथिन आणि एक फावडे विकत घेतले. यानंतर 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अनीसनं महेश यांना व्हॉट्सअ‍ॅपवर फोन करून पैसे परत करायचे आहेत, फ्लॅटवर ये, असं सांगितलं. त्यानंतर अनीस सोनिपत येथे मोबाईल फोन ठेवून थेट दिल्लीतील फ्लॅटवर आला. दुपारी बाराच्या सुमारास महेश त्यांच्या कारमधून आरके पुरम सेक्टर 2 मध्ये अनीसच्या घरी पोहोचले. तेथे अनीस व महेश यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी रागाच्या भरात अनीसनं महेश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला, त्यात महेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अनीसनं घरातील एसी सुरू केला, व तो फ्लॅट बंद करून तेथून निघून गेला. त्याने महेशचा फोन सोबत घेतला आणि दुचाकीवरून फरिदाबादच्या दिशेने निघाला. प्लॅननुसार, अनीस खून केल्यानंतर फरीदाबादमध्ये होता. जिथे त्याने महेशचा फोन ऑन केला आणि नंतर तो बंद केला. अनीसला कल्पना होती की, पोलिसांनी कधी महेशचा शोध घेतला तर त्याचे लोकेशन फरीदाबादमध्ये सापडेल, व पोलिस त्या भागात त्याचा शोध घेत राहतील. त्यामुळे त्या दिवशी म्हणजेज 28 ऑगस्ट 2023 रोजी तो फरीदाबादमध्येच फिरत राहिला होता. मात्र, पोलिसांनी एका धाग्यावरून या खुनाचा उलगडा केला आहे.

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
मैत्री, पैसा आणि गर्लफ्रेंड...फ्लॅटमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं उलगडलं गूढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल