TRENDING:

Nagpur News : उत्तर प्रदेशातील नेत्याच्या हत्येचा आरोप, नागपुरात राजकीय नेता, त्यानेच रचला दंगलीचा कट!

Last Updated:

Nagpur News : नागपूरमध्ये या संशियत आरोपीने निवडणूक लढवली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा आरोपी दिसला असून दंगलीनंतर भूमिगत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि इतर माहितीच्या आधारे या दंगलीचे सूत्रधार शोधून काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून अनेक गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील एका हिंदू नेत्याच्या हत्येचा आरोप असलेल्या आरोपीने नागपूर दंगलीचा कट आखला असल्याचे म्हटले जात आहे. नागपूरमध्ये या संशियत आरोपीने निवडणूक लढवली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा आरोपी दिसला असून दंगलीनंतर भूमिगत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

लखनऊमध्ये 2019 मध्ये झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. या हत्येचा कट रचल्या प्रकरणी सय्यद असीम अली याची चौकशी सुरू होती. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीतील हा मास्टमाइंड असल्याचा पुरावा पोलिसांना आढळून आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला तपास यंत्रणातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगली झालेल्या ठिकाणी अली हा सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर तो पसार झाला आहे. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

सय्यद अली आणि अटकेत असलेला आणखी एक सूत्रधार फहीम खान हे महाराष्ट्र राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन आखण्याच्या तयारीत होते, अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली. हा कायदा अर्बन नक्षलींविरोधात असल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

नागपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात...

तिवारी यांच्या हत्येनंतर नागपूरमध्ये राहणाऱ्या अलीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. जुलै 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याच्या गावी गेला. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात तत्कालीन एमडीपीचा उमेदवार आणि सध्या अटकेत असलेल्या फहीम खान याच्या निवडणूक प्रचाराला बळ देण्यासाठी तो नागपुरात परतला. विशेष म्हणजे महाराष्ट्र एटीएसने 2019 मध्ये त्याला अटक करण्याच्या काही महिने आधी अलीने नागपुरातून नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढवली होती.

advertisement

पोलीस ठाण्यातही दिसला होता सय्यद अली....

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

नागपूरमध्ये हिंसाचार सुरू होण्याच्या काही तास आधी असीम अली हा गणेशपेठ पोलिस ठाण्यात निदर्शकांसह दिसला होता. त्याच्या मोबाइल फोनच्या तपशीलांवरून तो दोन दंगलीच्या केंद्रांवर उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्याने या दरम्यान केलेले कॉल हे कथित दंगलखोरांना केले असल्याचे आढळून आले असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सय्यद अली हा नागपूरमध्ये व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur News : उत्तर प्रदेशातील नेत्याच्या हत्येचा आरोप, नागपुरात राजकीय नेता, त्यानेच रचला दंगलीचा कट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल