हेमलता वैद्य असं हत्या झालेल्या ३० वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अक्षय दाते असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी अक्षय आणि हेमलता मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. अक्षय हा सातत्याने हेमलतावर चारित्र्याचा संशय घेत होता. याच संशयातून त्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हेमलता ही विवाहित असून काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं. त्यानंतर ती आपल्या मुलीला घेऊन नागपुरात राहत होती.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हेमलता आणि आरोपी अक्षय दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी आहेत. हेमलताच्या चारित्र्यावर अक्षय नेहमी संशय घेत होता. त्यावरून दोघांचे भांडण होतं असत. घटनेच्या दिवशी मंगळवारी दोघांत पुन्हा वाद झाला होता. याच वादातून अक्षयने लोखंडी रॉडने हल्ला करत हेमलताचा जीव घेतला आहे. ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा हेमलता आपण राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये खुर्चीवर बसली होती.
यावेळी अचानक अक्षय पायऱ्यांवरून खाली आला. यावेळी त्याने आपल्या शरीराच्या मागे लोखंडी रॉड लपवला होता. हेमलता बसलेल्या ठिकाणी आल्यानंतर त्याने अचानक रॉड बाहेर काढला आणि हेमलतावर वार केला. यावेळी हेमलता जीवाच्या आकांताने ओरडू लागली. पण अक्षय तिच्यावर वार करत राहिला. त्याने अवघ्या २० सेकंदात तब्बल १५ वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीनं घटनास्थळी रॉड टाकला आणि तिथून चालत निघून गेला. हल्ल्याची माहिती समजताच सोसायटीतील लोकांनी हेमलताला मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अक्षयला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.
