राज कुशवाहा - मूळचा उत्तर प्रदेशचा राज कुशवाहा काही वर्षांपूर्वी इंदूरमध्ये राहायला आला होता. सुरुवातीला राज गोविंद नगरमध्ये भाड्याने राहत होता. त्यानंतर त्याला सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात नोकरी मिळाली आणि तो बाणगंगाजवळच्या भाड्याच्या घरात राहू लागला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी त्याची आईही त्याच्यासोबत राहत होती, पण काही काळापूर्वी ती परत उत्तर प्रदेशला गेली. सोनम आणि राज कुशवाहा यांच्या प्रेमसंबंधांना एक वर्षही झालं नाही.
advertisement
विशाल चौहान- विशाल चौहान हा राज कुशवाहाच्या शेजारी राहतो आणि तो राजचा चांगला मित्र होता. मित्रासाठी विशालने जोखीम पत्करली अन् शेवटी हात रक्ताने लाल केले. विशाल रॅपिडो बाईक चालवतो आणि त्याच्या कुटुंबासह राहतो.
आकाश राजपूत- या प्रकरणातील तिसरा आरोपी आकाश राजपूत बेरोजगार आहे. तो राजच्या परिसरातही राहत होता. त्यामुळे राज कुशवाहा त्याला चांगलं ओळखत होता. याचा फायदा घेत सोनमने त्यांना पैशाचे आमिष दाखवून योजनेत सहभागी करून घेतले. सोनमने सुमारे १० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
आनंद - या प्रकरणाती चौथा आरोप आनंद याच्याविषयी जास्त माहिती नाही. हा देखील राज कुशवाहाच्या जवळचा मानला जातोय. आनंद हा देखील इतर दोघांप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट किलर होता, अशी माहिती समोर आली आहे.