मयुर माळी असे मृत तरुणाचे नाव आहे. आई संगीता रामचंद्र माळी (वय वर्षे 50) आणि बहीण काजल रामचंद्र माळी (वय वर्षे 19) अशी आरोपींची नावे आहे. मयुरला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन आल्यानंतर त्याची आई आणि बहिणीसोबत सतत भांडण होत असे, वादानंतर तो शिवीगाळ करच दोघींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. सतत होणाऱ्या या भांडणाला आई संगीता आणि बहीण काजल कंटाळली होती. एक दिवशी मयुरने दोघींना बेदम मारहाण केली, त्यादिवशीच दोघींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हत्येचा कट रचला.
advertisement
गप्पा मारल्या अन् घरी गेला...
समोर आलेल्या माहितीनुसार, तासगावच्या कासार गल्लीत राहणारा मयूर हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तो मित्रांसोबत गप्पा मारत होता, त्यानंतर तो घरी गेला. शनिवारी आग लागल्याची घटना घरातील आतील बाजूस घडली. या आगीत होरपळून मयुरचा मृत्यू झाला. त्यानंतर मयुरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डोक्यात जबर मार लागल्याने मयुरचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले, त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी कशी केली पोलखोल
मयुरचे शरीर भाजलेले होते, पण त्याच्या डोक्यावर जखम होती. तसेच त्याचा डावा कान तुटलेला दिसला आणि डोळ्याच्यावरील बाजूला देखील काही जखमा होता.नाकातून आणि तोंडातून फेस पण आला असल्याने पोलिसांची शंका बळावली, त्यानंतर पोलिसांनी आईची आणि तिच्या लेकीची कसून चौकशी केली. या चौकशीत दोघींनी हत्या केल्याची कबुली दिली. या हल्ल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.