अन्न न मिळाल्याने ती अशक्त बनली होती. तपासासाठी तामिळनाडू, गोवा, मुंबईत पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. कायी कुमार एस नावाची ही महिला साखळीने पायाला बांधलेल्या अवस्थेत रोणापाल-सोनुर्ले येथील घनदाट जंगलात शनिवारी आढळली होती. गुराख्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तिला आता उपचारासाठी गोव्यात हलवलं आलं आहे . सावंतवाडीतील मडुरा रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे. योगाभ्यासासाठी भारतात ती आली होती.
advertisement
'त्या' अमेरिकन महिलेला सावंतवाडीच्या जंगलात कोणी आणि का बांधलं? प्रकरणात हादरवून टाकणारा खुलासा
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून ती अमेरिकन महिला असल्याने सिंधुदुर्ग पोलिसांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे. त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
बांदा पोलीस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत. रोणापाल येथील गुराखी पांडुरंग गावकर यांना ही महिला जंगलात पहिल्यांदा दिसली होती. मंगळवारी दिवसभर बांदा पोलीस ठाण्याचे विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने रोणापाल येथील जंगलात जात तपास केला. ती महिला कुठून आली? तिला इथे कसं आणण्यात आलं?कसं बांधण्यात आलं? याची सखोल माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत.
