advertisement

ब्रोकोली की फुलकोबी, कोणती भाजी जास्त हेल्दी? वजन कमी करण्यासाठी काय खावं?

Last Updated:

Health Tips: आपली भारतीय भाजी फुलकोबी आणि ब्रोकोली या भाज्या दिसायला जवळपास सारख्याच असतात. पण दोन्हीपैकी आरोग्यासाठी काय चांगलं आहे? हे जाणून घेऊया.

+
ब्रोकोली

ब्रोकोली की फुलकोबी, कोणती भाजी जास्त हेल्दी? वजन कमी करण्यासाठी काय खावं?

छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजार लवकर डोकं वर काढत आहेत. त्यामुळेच ‘आपण नेमकं काय खातो?’ हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. आपण कोणत्या भाज्या खातो? त्यावर आपलं आरोग्य देखील ठरतं. आपली भारतीय भाजी फुलकोबी आणि ब्रोकोली या भाज्या दिसायला जवळपास सारख्याच असतात. पण दोन्हीपैकी आरोग्यासाठी काय चांगलं आहे? हे जाणून घेऊया.
फुलकोबी खाण्याचे फायदे
फुलकोबी ही भारतीय स्वयंपाकघरात नेहमी वापरली जाणारी भाजी आहे. भाजी, उसळ, पराठा, कोशिंबीर अशा विविध प्रकारे फुलकोबी खाल्ली जाते. फुलकोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
वजन कमी करण्यासाठी...
फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहातं. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी फुलकोबी चांगला पर्याय मानला जातो. मात्र, फुलकोबी जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने शिजवली, तर काही लोकांना गॅस, पोट फुगणं किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती नेहमी मर्यादित आणि योग्य पद्धतीने खाणं महत्त्वाचं आहे.
advertisement
ब्रोकोली खाण्याचे फायदे
ब्रोकोली ही फुलकोबीच्याच कुटुंबातील असली, तरी पोषणाच्या बाबतीत ती अधिक प्रभावी मानली जाते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
advertisement
ब्रोकोली नियमित आहारात घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. महिलांसाठी ब्रोकोली विशेष फायदेशीर मानली जाते, कारण त्यातील कॅल्शियम आणि आयर्न शरीराला आवश्यक पोषण देतात. तसेच, ब्रोकोलीमध्ये असलेले काही नैसर्गिक घटक शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
advertisement
ब्रोकोली की फुलकोबी कोणती भाजी चांगली?
आरोग्याच्या दृष्टीने ब्रोकोली ही फुलकोबीपेक्षा अधिक पोषक भाजी आहे. पण याचा अर्थ फुलकोबी पूर्णपणे टाळावी असा नाही. फुलकोबी ही सहज उपलब्ध, स्वस्त आणि रोजच्या आहारासाठी उपयुक्त आहे. तर ब्रोकोली थोडी महाग आणि सर्वत्र सहज मिळणारी नसते. त्यामुळे दोन्ही भाज्यांचा समतोल वापर करणे हेच आरोग्यासाठी योग्य ठरते. फुलकोबी रोजच्या आहारासाठी चांगली, तर ब्रोकोली अतिरिक्त पोषण आणि आरोग्य फायद्यांसाठी उत्तम आहे.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
ब्रोकोली की फुलकोबी, कोणती भाजी जास्त हेल्दी? वजन कमी करण्यासाठी काय खावं?
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement