TRENDING:

BFसोबत रिसॉर्टवर, 17 वर्षीय मुलीवर गोळीबार, प्रकरणाला वेगळं वळण, हॉटेल मालकासह पोलिसांवर संशय

Last Updated:

Crime in Palghar: मागील आठवड्यात पालघरच्या केळवेमधील एका रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर: मागील आठवड्यात पालघरच्या केळवेमधील एका रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाला होता. संबंधित मुलगी गावठी कट्टा हाताळत असताना बंदुकीचा ट्रीगर दबला आणि मुलीच्या मानेत गोळी शिरली. ती मुलगी आपल्या प्रियकरासह रिसॉर्टवर आली होती. त्याच्या बॅगेत हा गावठी कट्टा होता. आता या रिसॉर्टमधील गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणी रिसॉर्टच्या मालकासह पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (३० मे) दुपारच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खासगी रिसॉर्टवर गेली होती. रुममध्ये गेल्यानंतर तिचा प्रियकर वॉशरूममध्ये गेला होता. प्रियकर वॉशरुमला गेल्यानंतर या मुलीने त्याची बॅग तपासून पाहिली. मात्र बॅगेमध्ये तिला विनापरवाना असलेला गावठी कट्टा सापडला. गावठी कट्टा तिने बाहेर काढला आणि त्याची पाहणी करत होती. नेमकं त्यावेळी या मुलीकडून चुकून ट्रिगर दाबला गेला अन् गोळी सुटली आणि ती गोळी थेट मुलीच्या मानेत घुसली. या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली.

advertisement

आता या प्रकरणात पालघर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय. अल्पवयीन मुलींना रिसॉर्टमध्ये प्रियकरासोबत परमिशन देणाऱ्या रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुण आणि गावठी कट्टा पुरवणाऱ्याला पोलिसांकडून वाचवल जात असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी या तिघांनाही तपासातून वगळलं आहे. रिसॉर्ट मालक आणि पिस्तूल पुरवणाऱ्या बाळा पाटील नामक इसमाला पालघरच्या केळवे पोलिसांकडून क्लीन चीट दिली का? असा सवाल विचारला जातोय.

advertisement

पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील आहे. तिच्यावर बोईसरच्या अधिकारी लाईफ लाईन्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीवर उपचार करण्यासाठी तिच्या कुटुंबाकडे पैसे देखील नाहीयेत. अशात मुलीच्या कुटुंबीयांनी घर गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव करून उपचार सुरू आहेत. सध्या तिच्या मानेत अडकलेली गोळी काढण्यात आली आहे. मात्र तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. अशात पोलिसांनी रिसॉर्ट मालकासह प्रियकर आणि गावठी कट्टा पुरवणाऱ्यावर कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
BFसोबत रिसॉर्टवर, 17 वर्षीय मुलीवर गोळीबार, प्रकरणाला वेगळं वळण, हॉटेल मालकासह पोलिसांवर संशय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल