पोलिसांनी मुलीला उपचारासाठी चरक रुग्णालयात दाखल केले, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला इंदूरला रेफर केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रकृती खालावत चालल्याने पोलिसांनी स्वतः रक्त देऊन वाचवले. मात्र, तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाल्यामुळे तिचे खूप रक्त वाया गेले होते. या संपूर्ण प्रकरणात उज्जैन एसपींनी एसआयटी स्थापन केली आहे. बलात्कारानंतर मुलीने काही लोकांकडे मदत मागितली. मात्र, कोणीही तिला मदत केली नाही. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.
advertisement
मुलीची प्रकृती गंभीर
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली होती. जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक बनली होती. इंदूरच्या रुग्णालयात तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. उज्जैनच्या बडनगर रोडवर असलेल्या दांडी आश्रमाजवळ संध्याकाळी ही मुलगी जखमी अवस्थेत आढळली. मुलीचे कपडे रक्ताने माखले होते. महाकाल पोलीस ठाण्याने मुलीला चरक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी तिला इंदूरला रेफर केले. उपचारादरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना दुजोरा दिला आहे. हळूहळू मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.
वाचा - प्राध्यापकाची 17 वर्षीय विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; म्हणाला, 'माझी मसाज'
पोलिसांनी स्वतः दिलं रक्त
उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, महाकाल पोलिस स्टेशन हद्दीतील बडनगर रोडवरील मुरलीपुरा येथील दांडी आश्रमाजवळ मुलगी जखमी अवस्थेत आढळली. यानंतर तिला चरक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला जास्त रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी तिला रक्त देऊन मदत केली. एसपी म्हणाले की, तरुणीच्या बोलण्यावरून ती प्रयागराज (यूपी) येथील रहिवासी असल्याचे दिसते. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मुलीला बोलता येत नसल्याने ही घटना कुठे घडली हे कळू शकले नाही. सध्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
