Crime News : प्राध्यापकाची 17 वर्षीय विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; म्हणाला, 'माझी मसाज करुन'
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : अमरावतीत विद्यार्थीनी व प्राध्यापकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावती, 26 सप्टेंबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : आईवडिलानंतर शिक्षकाला गुरू मानलं जातं. कारण, शिक्षकच विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नात सर्वश्रेष्ठ मानलं जातं. याच नात्याला अमरावती जिल्ह्यात काळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीकडे प्राध्यपकाने थेट शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती येथील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकाच्या नात्याला कलंक फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातच शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय मागासवर्गीय विद्यार्थीनीकडे विश्वास जाधव नामक प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली. माझी मसाज करून दे अशीही मागणी या प्राध्यापकाने केली. घडला प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी नराधम प्राध्यापक विश्वास जाधव याला अटक केली आहे. आरोपी प्राध्यापकावर पोस्कोसह अट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
advertisement
सासू, बायकोच्या भावाला जिवंत जाळलं
अमरावती जिल्ह्यात जावयानेच सासूला आणि भावाला जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी जावयाने स्वत:ला देखील जिवंत जाळून आत्महत्या केलीआहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरात आग लागल्याचे कळताच ही घटना उघडकीस आली आहे.
वाचा - चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंबईतील खळबळजनक घटना
अमरावती जिल्ह्याच्या वरूड तहसील बेनोडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास एका घराला आग लागली होती. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होतं आगीवर नियंत्रण आणले होते. या दरम्यान घरात तीन जणांचा मृतदेह जळाल्या अवस्थेत सापडला होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Crime News : प्राध्यापकाची 17 वर्षीय विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; म्हणाला, 'माझी मसाज करुन'