RCBचे नाव बदलणार का? बेंगळुरूची टीम पुण्याची होणार! बिझनसमॅन लावणार मोठा डाव
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला अजून अवकाश आहे.त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या मालकी हक्काबाबत सध्या मोठी घडामोड समोर आली आहे.
RCB Adar Poonawalla : आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला अजून अवकाश आहे.त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या मालकी हक्काबाबत सध्या मोठी घडामोड समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी आरसीबी संघ विकत घेण्यासाठी बोली लावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे असे जर झाल्यास बंगळुरू टीम मुंबईची होणार आहे.
आरसीबीचे सध्याचे मालक 'युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड' (USL) असून त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच नवीन मालकाचा शोध सुरू केला होता. कंपनीच्या मते, क्रिकेट हा त्यांच्या मद्य व्यवसायाचा मुख्य भाग नसल्याने ते हा संघ विकून व्यवसायाचे धोरणात्मक नियोजन करत आहेत.
Over the next few months, will be putting in a STRONG and COMPETITIVE bid for @RCBTweets, one of the best teams in the IPL.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 22, 2026
advertisement
तसेच, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना झालेल्या एका दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ही विक्री प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकली आहे. विशेष म्हणजे, अदार पूनावाला यांच्यासोबतच 'KGF' फेम होमबाले फिल्म्स देखील हा संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत असल्याचे समजते.
दुसरीकडे, आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. हा संघ आपले घरगुती सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी पुणे, मुंबई किंवा रायपूर येथे हलवण्याच्या विचारात आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने त्यांना बेंगळुरूमध्येच राहण्याची विनंती केली असली, तरी सुरक्षा आणि इतर तांत्रिक कारणांमुळे संघ व्यवस्थापन अद्याप द्विधा मनस्थितीत आहे. आरसीबी सध्या आयपीएलचा गतविजेता संघ असून, मालकी हक्काच्या या बदलामुळे संघाच्या भविष्यातील रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
अदार पूनावाला यांनी एक्सवर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी आरसीबी संघ विकत घेण्यासाठी आपण 'बळकट आणि स्पर्धात्मक' बोली लावणार असल्याचे जाहीर केले आहे. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असून आगामी काही महिन्यांत ते अधिकृतपणे खरेदीची प्रक्रिया पार पाडतील. त्यामुळे आता अदार पुनावाला खरंच आरसीबीला खरेदी करतात का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 9:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCBचे नाव बदलणार का? बेंगळुरूची टीम पुण्याची होणार! बिझनसमॅन लावणार मोठा डाव







