ठाण्यातील मुंब्रा येथून निवडून आलेल्या एका तरुण नगरसेविकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कैसे हराया..५ वर्षात मुंब्रा हिरवा करणार, असं म्हणत IMIM पक्षाची मुंब्रामधील तरुण नगरसेविका सहर शेखच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात भाजपचे नेते किरिट सोमय्या आणि नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. सहर शेखच्या घरी पोलिसांची नोटीस आली आहे. झाजपचे नेते कारवाईची मागणी करत आहेत.



