Bhiwandi: काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेला वेग, भिवंडीचे महापौर-उपमहापौरही ठरले?

Last Updated:

राष्ट्रवादी शदचंद्र पवार पक्षाने कोकण भवन येथे गट नोंदणी केली. गट नेतेपदी अन्सारी मुसर्रत मोहम्मद अरशद यांची नियुक्ती करण्यात आली.

भिवंडी महापौरपदी कोण?
भिवंडी महापौरपदी कोण?
नरेश पाटील, भिवंडी: भिवंडीत महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने महापौर पदासाठी हालचालींना वेग आलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात सत्ता वाटपाच्या वाटाघाटीही पूर्ण झाल्या आहेत.
महापौर पदासाठी काँग्रेसकडून तारिक मोमिन, हे नावे समोर येत आहे. तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी उपमहापौर इमरान खान यांची मुलगी अ‌ॅड. ईशा इमरान खान यांच्या नावावर उपमहापौर पदासाठी एकमत झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.
महापौरपदासाठी मॅजिक फिगर ४६ आहे. काँग्रेसचे ३० नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे १२ नगरसेवक मिळून ४२ नगरसेवक होत आहेत. त्यांना समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल, असे निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षांच्या बळावर काँग्रेसचे महापौर बसतील तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा उपमहापौर बसवण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
advertisement

भिवंडीचे पक्षीय बलाबल कसे आहे?

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेले नाहीये. काँग्रेस ३०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १२, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी आणि अपक्ष ४ असे भिवंडीतील पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाच्या विरोधात आमदार रईस शेख यांनी बंड केले होते. आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला उघड मदत केली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi: काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेला वेग, भिवंडीचे महापौर-उपमहापौरही ठरले?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement