डाळींबाच्या दरात मोठी उलथापालथ, शेवगा आणि कांद्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
मुंबई: गुरुवार, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2733 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1206 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल आल्यास 6000 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याचे दर स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 274 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 125 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 10000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 13000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1402 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 1012 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 10000 ते 15000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 21 क्विंटल डाळिंबास 5000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 9:37 PM IST









