Mumbai : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंबईतील खळबळजनक घटना
- Published by:Shreyas
Last Updated:
16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.
मुंबई, 25 सप्टेंबर : 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईच्या मुलुंड भागामध्ये रविवारी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे, तर आरोपीचा साथीदार पळून गेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी पीडित मुलीला ओळखत होता तसंच तोही त्याच भागामध्ये राहत होता. मुलगी घरात एकटी असताना आरोपी त्याच्या मित्रासोबत आला, यानंतर त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला आणि तिथून निघून गेला.
मुलीने घडलेला सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला, यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला मुलुंडमधून अटक केली, तर आरोपीचा दुसरा साथीदार फरार आहे. आरोपीवर कलम 376 सोबत इतर कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गतही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 8:14 PM IST