एकुलत्या एका पुतण्याचा खून
सविस्तर वृत्त असे की, स्वपिल देविदास निवडंगे (वय-30, रा, हिवरा, ता. पूर्णा) असे मृत्यू झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या चुलत्याचे नाव दिंगबर सोपान निवडंगे (वय-50) असे आहे. स्वप्निल गावात किराणा दुकान चालवत होता, तसेच साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटर म्हणूनही काम करत होता. हिवरा येथे देविदास निवडंगे आणि आरोपी दिगंबर निवडंगे हे दोन भाऊ राहतात. देविदास यांना स्वप्निल हा एकुलता एक मुलगा होता. तर आरोपी दिगंबरला तीन मुली आहेत.
advertisement
उपचारापूर्वी वाटेतच झाला मृत्यू
आरोपी दिगंबर निवडंगे याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गावात प्रत्येकजण त्याला दारू सोडण्यास सांगत होते. पुतण्या स्वप्निलनेही काका दिंगबरला 'दारू सोडून, समाजात बदनामी होतीय', असा सल्ला दिला. त्याचा राग मनात धरून काकाने शुक्रवारी स्वप्निलवर चाकून हल्ला चढविला. मानेवर, पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या स्वप्निलला ताबडतोड हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : Cyber Crime: 'ती' फाइल आली अन् क्लिक केली; सायबर चोरट्यांचा 7 लाखांवर डल्ला, सांगलीतील दोघांना 'असं' लुटलं!
हे ही वाचा : कोल्हापूरात भयानक प्रकार! 7 वर्षे घर मालकाचा महिलेवर अत्याचार, जेव्हा सत्य समजले तेव्हा...